अहमदाबाद: अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर बॉम्ब असल्याची अफवा सगळीकडे पसरली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व प्रवाशांना बाहेर काढले जात आहे. 


पोलिसांचे आहवान


तसेच गोंधळ, गर्दी करु नये असे आवाहनही पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.


गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्व प्रमुख शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


पंतप्रधानांची रॅली


९ ते १४ डिसेंबर दरम्यान गुजरात निवडणूका आहेत. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ ते २९ नोव्हेंबर या काळात रॅली काढणार आहेत.


पंतप्रधानांच्या ८ रॅली या ठिकाणी होणार आहेत. राज्यात निवडणूक प्रचाराचे कार्य जोरात सुरु आहे. 


काँग्रेस-भाजप आणि इतर पक्षांचे अनेक नेते राज्यातील  ठिकठिकाणी प्रचारासाठी पोहोचले आहेत.