दिल्लीः लग्न लागले, (Wedding) माप ओलांडून घरात आली अन् दुसऱ्याच दिवशी नवरीने (Bride) बाळाला जन्म दिला. एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे वाटेल अशी घटना दिल्लीत घडली आहे. ग्रेटर नोएडातील एका कुटुंबात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. लग्नानंतर अवघ्या एकच दिवसांत नवरीने मुलीने जन्म दिल्याने एकच खळबळ माजली आहे. तर, बायकोचे सत्य अशाप्रकारे बाहेर आल्याने नवरदेवाला मोठा धक्का बसला आहे. (Bride Gives Birth To a Baby After Marriage)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवरदेवाच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलिसांनी माहिती दिली आहे. तर, नवरदेवाने मुलीला आणि पत्नीला स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यानंतर मुलीच्या घरचे तिला आणि नवजात मुलीला घेऊन माहेरी निघून गेले आहे. या घटनेमुळं परिसरात एकच चर्चा रंगली होती. 


नवरीची तब्येत बिघडली


सोमवारी दोघांचे लग्न झाले होते. लग्नानंतरचे सगळे रिती-रिवाज झाले. नवरी माप ओलांडून घरी आली सगळं काही व्यवस्थित सुरू असताना अचानक मंगळवारी नवरीच्या पोटात कळा यायला सुरूवात झाल्या. दुखणं इतकं वाढलं की सासरच्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यानंतर ती सात महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती दिली. त्यानंतर घरात एकच खळबळ उडाली. 


दुसऱ्याच दिवशी बाळाला जन्म


महिलेची प्रकृती बिघडल्याने लगेचच तिची प्रसूती करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. काहि वेळातच महिलेने एका मुलीला जन्म दिला. दरम्यान, नवरीचे सत्य समोर आल्याने नवरदेवाला मोठा धक्का बसला आहे. त्याने लगेचच नवरीच्या माहेरच्यांना रुग्णालयात बोलवून घेतले. नवरदेव व त्याच्या घरच्यांनी तरुणी व तिच्या मुलीला स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यानंतर हे सर्व प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे. 


नवरदेवाने घेतला निर्णय


नवरदेवाने केलेल्या आरोपांनुसार, जवळपास पाच महिन्यांपूर्वी लग्न ठरवण्यात आलं होतं. तेव्हा मी मुलीला पाहिलं होतं. आमचं बोलणंदेखील झालं होतं. मात्र, याबाबत तिने काहीच सांगितलं नव्हतं. तसंच, नवरीच्या कुटुंबीयांनीदेखील ही गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवली. फसवणूक झाल्याचा आरोप करत नवरदेवाने तरुणीला स्वीकारण्यास नकार दिला आहे.     


दरम्यान, हे सगळं प्रकरण पोलिस ठाण्यात गेले आहे. नवरदेवाने बायकोला स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर नवरीची आई तिला व नवजात मुलीला घेऊन माहेरी निघून गेले आहेत. मात्र, या सगळ्या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली असून लग्नाच्या आनंदावर एका दिवसातच विरजण पडलं आहे.