मुंबई : लग्न म्हटलं की, मजा मस्ती, चालीरिती, नाच गाणी सगळं काही येतं. लग्नात वधू वरांप्रमाणे कुटुंबीय आणि मित्रांसोबत देखील खूम मजा करतात. यावेळी वधू वर हे लग्नाचे मुख्य आकर्षण असतात. काही लोकं या सोहळ्यातील काही सुंदर, आनंदी आणि मजेदार क्षणं सोशल मीडियावर देखील टाकतात. दरम्यान, यावेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी मर्यादेपेक्षा जास्त मस्करी केली, तर लोकांना याचा संताप देखील आला आहे. असाच काहीसा प्रकार एका लग्नात पाहायला मिळाला, जेव्हा वधू-वर स्टेजवर बसले होते आणि त्यांच्या मित्रांनी असा विनोद केला, जो पाहून सगळेच थक्क झाले.


Vishwakarma Puja 2022: तुमच्याकडे गाडी आहे तर 'या' दिवशी नक्कीच करा विश्वकर्मा पूजा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, लग्नाच्या दिवशी वर आणि वधू स्टेजवर असलेल्या सोफ्यावर बसले आहेत आणि नंतर स्टेजवर वराचे मित्र येतात आणि मस्करीत स्नो स्प्रे करू लागतात. मस्करी म्हणतं वराच्या मित्रांनी थोडं नाही तर खूप जास्त स्नो स्प्रे केला. एकवेळ अशी आली की वराचा चेहरा दिसूनासा झाला. तर दुसरीकडे वधू तिच्या लेहेंग्यावर असलेला स्नो स्प्रे काढताना दिसते. 


Surya Gochar 2022: 17 सप्टेंबर पासून सुर्याप्रमाणे चमकेल 'या' राशीच्या लोकांचे भाग्य


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आणखी वाचा : Queen Elizabeth II च्या आमंत्रणाला अमिताभ बच्चन यांनी दिला होता नकार, जाणून घ्या कारण
ही मस्करी पाहता वधू शांत दिसत होती, तर वर रागानं सोफ्यावर बसचा होता. इतकंच काय तर मित्रांची चेष्टा सहन करण्याचा प्रयत्न करत होता. हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रचंड व्हायरल झाला आहे. ब्राइड्स_स्पेशल नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओल 50 हजार पेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे.  असून आतापर्यंत ५० हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केलं आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका नेटकऱ्यानं लिहिले, 'काय सुरु आहे, मी तिथे असतो तर मला राग आला असता. तयार होण्यासाठी इतके पैसे खर्च करा आणि मग असे मूर्खपणाचे कृत्य.' अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.