मेकअप करायला गेली नवरी...पार्लरमध्येच लागला डोळा..नंतर जे घडलं..
एका नववधूचा व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून तुम्हाला हसू येईल.
मुंबईः लग्नाच्या दिवशी नवरीला मेकअपसाठी अनेक तास आधी ब्युटी पार्लर गाठावे लागते, जेणेकरून वेळेत मेकअप पूर्ण होईल. मात्र, अनेकदा पार्लरमध्ये वेळेत पोहोचूनही वाट पाहावी लागते. असाच एक नववधूचा व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून तुम्हाला हसू येईल.
सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक नववधू खूप शांत झोप घेत आहे.
इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तरुणी वधूचा मेकअप करत आहे. मात्र लग्नाच्या धावपळीत वधू अनेक दिवस नीट झोपली नव्हती आणि तिला ब्युटी पार्लरमध्ये विश्रांती मिळताच ती झोपी गेली.
मेकअप करणार्या महिलेने तिचा व्हिडीओ कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला आणि मेक-अप करताना नवरी कशी झोपली हे दाखवले. झोपलेल्या वधूचे तोंड उघडे राहते. झोपेशिवाय तिला आता कशाचीच पर्वा नाही असे दिसते.
सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. teeshamakeovers नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.