उत्तरप्रदेश : लग्न म्हटलं की पारंपारिक रितीरिवाज हे आलेच. सात फेरे घेतल्यावर वधू-वराना अनेक रिवाज पार पाडावे लागतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशात लग्नात नवरदेवाचे जोडे चोरण्याचाही काही भागांमध्ये रिवाज आहे. नवरीच्या बहिणींना या क्षणांची फारच आतुरता लागलेली असते. कारण त्यांना ही चोरी करून बक्षिस मिळणार असतं. पण यूपीच्या बदायूं जिल्ह्यात अशाच एका रिवाजावेळी रंगात भंग पडला. 


नवरदेव आणि त्याच्या मित्रांवर हत्येचा आरोप


इथे जोडे चोरीच्या आरोपाखाली एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली. इतके की तो मरण पावल. हत्येचा आरोप नवरदेव आणि त्याच्या मित्रांवर लावण्यात आलाय. पोलिसांना मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या पत्नीच्या तक्रारीवरून नवरदेव आणि त्याच्या मित्राच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केलाय. 


नवरदेव वरात घेऊन आला...


ही घटना बदायूं जिल्ह्यातील बिल्सी परीसरातील आहे. पोलिसांनी सांगितले की, बिल्सी पोलीस स्टेशन क्षेत्रात राहणा-या सुरेंद्रचं लग्न सूरजपूर गावात होतं. बुधवारी सुरेंद्र वरात घेऊन गावात पोहोचला. इथे आल्यावर सुरेंद्रने जोडे काढले आणि ती रिवाजांमध्ये सामिल झाला. 


त्या व्यक्तीला मारहाण


थोड्यावेळाने लग्न पूर्ण झाल्यावर पाहिलं तर सुरेंद्रचे जोडे तेथून गायब झाले होते. त्यामुळे सुरेंद्र चिडला. तो आरडाओरड करू लागला. त्याच्या मित्रांनीही गोंधळ घातला. आरोप आहे की, सुरेंद्र आणि त्याच्या मित्रांनी जवळ उभ्या असलेल्या रामसरन(४२) या व्यक्तीवर जोडे चोरी केल्याचा आरोप लावला. त्यानंतर सर्वांनी रामसरन याला मारहाण करायला सुरूवात केली. यात तो गंभीर जखमी झाला. नंतर त्याने रूग्णालयातच प्राण सोडले.