इंग्रजांनी भारतातून किती रुपये लुटले? तुम्ही अंदाजही लावू नाही शकणार इतका मोठा आकडा!
Ammount looted British From India: इंग्रजांनी भारतावर 200 वर्षे राज्य केले. याकाळात इंग्रजांनी त्यांचे कायदे आपल्यावर लादले.
Ammount looted British From India: इंग्रजांनी भारतावर 200 वर्षे राज्य केले. याकाळात इंग्रजांनी त्यांचे कायदे आपल्यावर लादले. अनेक संसाधने लुटली. वेगवेगळ्या प्रकारचे कर लादून भारतीयांचे शोषण केले. भारतीयांना गुलाम बनवून ठेवले. साधारण 200 वर्षाहून अधिक काळ राज्य करताना इंग्रजांनी भारतातून किती रक्कम लुटले? हे तुम्हाला माहिती आहे का?
भारताला इंग्रजांनी बनवलं कंगाल
कधीकाळी भारतातून सोन्याचा धूर निघायचा असं म्हटलं जातं. कारण भारत हा सर्वप्रकारच्या संसाधनांनी समृद्ध होता. पण या अखंड भारताला नजर लागली. भारतावर परकियांनी आक्रमणे झाली. अनेक राजवटी आल्या. पण यासर्वात इंग्रजांनी भारताची खूप लूट केली.भारतावर राज्य करत असताना इंग्रजांनी 45 ट्रिलियन डॉलर म्हणजेच साधारण 3 हजार लाख कोटी रुपयांची संपत्ती लुटली. हा आकडा लिहिताना त्यावर किती शून्य लावावे लागतात याचा अंदाजही आपण लावू शकत नाही. इंग्रजांनी भारतातून 3,19,29,75,00,00,00.50 रुपये लुटले. ही रक्कम युनायटेड किंगडमच्या जीडीपीपेक्षा 17 पट जास्त आहे.
1765 ते 1938 पर्यंत ब्रिटिशांनी एकूण 9.2 ट्रिलियन पौंडांचा खजिना लुटला, ज्याची किंमत आज 45 ट्रिलियन डॉलर आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे अटलांटिक कौन्सिलच्या बैठकीत स्वतः परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ही माहिती दिली होती.सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ उत्सव पटनायक यांच्या अर्थशास्त्र अभ्यास संशोधन अहवालाच्या आधारे एस जयशंकर यांनी ही आकडेवारी सर्वांसमोर आणली . कोलंबिया विद्यापीठाने यासंदर्भात एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार 1765 ते 1938 दरम्यान ब्रिटिशांनी भारतातून 45 ट्रिलियन डॉलर्सची संपत्ती लुटली.
भारतातून लुटलेल्या पैशांचा वापर कशासाठी?
इंग्रजांनी हिंसाचारासाठी पैसा वापरल्याची माहिती यात देण्यात आली आहे. ब्रिटीश राजवटीत भारतातील विनिमय दर प्रति पौंड 4.8 अमेरिकन डॉलर इतका होता. इंग्रजांनी भारतातून जो काही पैसा लुटला तो 1840 मध्ये चिनी आक्रमण आणि 1857 मधील बंड दडपण्यासाठी वापरला गेला. भारतीयांकडून गोळा केलेल्या महसुलातूनच ब्रिटन इतर देशांशी युद्धासाठी वित्तपुरवठा करत असे. यासोबतच कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांचा विकास करत असे. 1847 मध्ये ब्रिटीश राजवट भारतात पूर्णपणे लागू झाल्यावर नवीन कर आणि अबकारी व्यवस्था लागू करण्यात आली. या काळात भारतासोबत परकीय व्यापार करू इच्छिणाऱ्या कोणालाही विशेष काऊन्सिल बिल वापरावे लागत असे. यातून इंग्रज सरकारला खूप फायदा होत असे.
भारतीयांचा पैसा ब्रिटनमध्ये कसा पोहोचायचा?
इंग्रजांकडे भारत लुटण्यासाठी नवनवीन पद्धती होत्या. भारताला लुबाडण्यासाठी इंग्रजांनी नवा कायदा केला होता. ब्रिटिशांकडे एक वेगळ्या प्रकारचे कागदी चलन होते. जे फक्त ब्रिटीश क्राउन घेऊ शकत होते. हे चलन तुम्हाला मिळवायचे असेल तर त्यासाठी एकमेव मार्ग होता. यासाठी तुम्हाला लंडनमधील सोने किंवा चांदीच्या बिलांसाठी त्यांची देवाणघेवाण करावी लागत होती. ही बिले भारतीय व्यापाऱ्यांकडे गेल्यावर त्यांना ब्रिटिश सरकारकडून रोख मिळवून द्यावी लागली. भारतीय जेव्हा ही बिले रोखीत असत, तेव्हा त्यांना रूपयांमध्ये पैसे मिळायचे. विशेष म्हणजे त्यांनी भरलेल्या करातून ही रक्कम जमा झाली. म्हणजे केवळ व्यापाऱ्यांचे पैसे त्यांना दिले गेले.
भारतीयांनीच बनवलेल्या सामानावर लादला कर
भारतातून सोने आणि चांदी ब्रिटनमध्ये पोहोचू लागली.यासोबतच भारतीयांनीच बनवलेले सामान भारतात विकला गेले ज्यावर कर भरावा लागत असे. इंग्रज भारतात फक्त कराच्या पैशाने वस्तू खरेदी करत असत. म्हणजे भारतीयांच्या कराच्या पैशातून ते फुकटात वस्तू खरेदी करायचे. भारतीय वस्तू ब्रिटनमध्ये नेऊन इतर देशांना महागड्या किमतीत विकल्या जायच्या. यातून इंग्लंडला दुहेरी उत्पन्नही होत होते.