ब्रोकर म्हणतात, दिवाळीपर्यंत सोन्याचे दर....
पाहा हे थक्क करणारं निरिक्षण ....
नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून Gold rates सोन्याच्या दरांमध्ये सातत्यानं घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करण्यासाठी हाच काळ योग्य आहे की येत्या काळात या दरांत आणखी कपात होण्याची वाट पाहायची, असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. सहसा सोन्याच्या किंमतीत वाढ होवो अथवा घसरण, सणासुदीच्या दिवसांमध्ये सराफा बाजारांना नवी झळाळी येते. अनेकांचाच सोनं खरेदीकडे कल दिसतो. त्यातही दिवाळीमध्ये होणारी सोनं खरेदी ही विशेष महत्त्वाची असते.
सोनं खरेदीकडे अनेकांचाच कल पाहता यंदाच्या दिवाळीतही हे चित्र दिसेल. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत होणारी घसरण येत्या काळातही कायम राहील असं म्हटलं जात आहे.
ऑक्टोबरमध्ये सोन्याचे दर कोणती उंची गाठणार?
ब्रोकर लक्ष्य (रुपये प्रति10 ग्रॅम)
पॅराडाइम कमोडिटी 54,000
कोटक सिक्योरिटीज 53,000
ट्रस्टलाइन 52,500
एक्सिस सिक्योरिटीज 52,500
SMC कॉमट्रेड 52,200
मोतीलाल ओसवाल 52,000
एंजेल कमोडिटी 52,000
LKP सिक्योरिटीज 52,000
केडिया कमोडिटी 52,000
पृथ्वी फिनमार्ट 52,000
दिवाळीच्या दिवसांमध्ये सोन्याचे दर नेमके किती असणार हासुद्धा अनेकांच्याच मनात घर करणारा प्रश्न. ब्रोकर्स पोलच्या निरिक्षणातून एक लक्ष वेधणारी बाब समोर आली. ती म्हणजे ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये सोन्याचे दर चांगलीच उंची गाठणार आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत सोन्याच्या दरात मोठी तफावत असणार आहे. काही ब्रोकर्सच्या मते तर, हे दर अंदाजे 58000 च्या घरात पोहोचणार आहेत. दिवाळी आणि त्यादरम्यानच्या दिवसांमध्ये दराचे हे आकडे विक्रमी टप्पा ओलांडणार असल्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दिवाळीपर्यंतचे अंदाजे दर...
ब्रोकर्स लक्ष्य (रुपये प्रति10 ग्रॅम)
ग्लोब कॅपिटल 58000
कोटक सिक्युरिटीज 55000
पॅराडाइम 57000
ट्रस्टलाइन 55000
SMC कॉमट्रेड 54500
रेलिगेयर ब्रोकिंग 54200
ट्रेडबुल्स सिक्योरिटीज 54000
एंजेल कमोडिटी 54000
केडिया कमोडिटी 54000
LKP सिक्युरिटीज 53500
पृथ्वी फिनमार्ट 53000
मोतीलाल ओसवाल 53000
आनंद राठी 53000
चॉइस ब्रोकिंग 53000
निर्मल बंग 53000
ऑक्टोबरप्रमाणंच दिवाळीच्या दिवसांत सोन्याचे दर कमी होती असा तुमचा समज असेल आणि त्यादरम्यान सोनं खरेदी करण्यासाठीही प्रतीक्षा तुम्ही करत असाल तर, याचा मोठा फटका बसू शकतो. सद्यस्थितीला सोनं रेकॉर्ड हायपेक्षा ६००० रुपयांनी तर, चांदी १६००० रुपयांनी स्वस्त आहे. बुधवारी भारतात सातत्यानं दुसऱ्या दिवशीही सोन्याचे दर घसरल्याचं पाहायला मिळालं.