Anti Drone Guns : पाकिस्तानकडून सातत्यानं होणाऱ्या दहशतवादी कारवायांना भारताकडून कायम चोख प्रत्युत्तर दिलं जातं. पाकिस्तान लगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना खीळ बसवण्यास भारत कायम सफल होतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताकडून वारंवार मात मिळाल्यानंतरही पाकिस्तानच्या नापाक कारवाया मात्र सुरूच असतात. ड्रोन्सच्या माध्यमातून सीमेपलीकडून होणार शस्त्रसाठा भारतासाठी अजूनही डोकेदुखी ठरतोय.


अशात जम्मू काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी भारत कायम सज्ज असतो.  


दहशतवाद्यांच्या कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी बॉर्डर सेक्युरिटी फोर्सने म्हणजेच BSF ने  बॉर्डरवर एक खास गन तैनात करण्याचा निर्णय घेतलाय. एवढंच नाही तर BSF आता LoC म्हणजेच लाईन ऑफ कंट्रोल आणि जम्मूलगतच्या आपल्या तब्बल 112 पोस्ट्सचं (BoP) आधुनिकीकरण देखील करणार आहे. 


अशी असेल अँटी ड्रोन सिस्टीम 


  • BSF जी अँटी ड्रोन सिस्टीम विकत घेणार आहे, ती प्रामुख्याने दोन प्रकारची असेल  

  • पहिल्या सिस्टीमचं वजन साधारणतः 10kg असेल, यामाध्यमातून 2 किलोमीटरपर्यंतच्या शत्रूचा खात्मा करता येईल

  • दुसऱ्या सिस्टीमचं वजन केवळ 6 किलो असणार आहे. या अँटी ड्रोन मिसाईलची रेंज 1 किलोमीटरची आहे 

  • Unmanned Aircraft System (UAS) ला केवळ बॅगेतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येऊ शकतं

  • या Unmanned Aircraft System (UAS) सिस्टीमचं वैशिठ्य म्हणजे हे शत्रूच्या सिग्नल्सला किंवा फ्रिक्वेन्सीला जॅम करतात 


गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पोस्टजवळ ड्रोन्सच्या माध्यमांतून हत्यारं आणि ड्रग्सची तस्करी झाली, अशा ठिकाणी या गन्स तैनात करण्यात येतील.


बॉर्डर सेक्युरिटी फोर्सेस म्हणजे BSF या अँटी ड्रोन गन्सचा वापर त्या 112 पोस्टवर करणार आहे. ज्यामुळे पाकिस्तानच्या नापाक कारवायांना खीळ बसेल. 


LoC नजीकच्या फॉरवर्ड पोस्ट्सवर थंडीच्या दिवसांमध्ये तापमान -30 से -40 डिग्रीपर्यंत खाली उतरतं. पाकिस्तानकडून एलओसीच्या अशा फॉरवर्ड लोकेशन पोस्ट्सवर ( All Weather Shelter ) शेल्टर हाऊस बनवलं जाणार आहे.


या शेल्टर हाऊसवर सोलर पॅनल्स बसवले जाणार आहेत. ज्यामुळे या तंबूंमधील तापमान नियंत्रित ठेवलं जाऊ शकतं. 


BSF soon be procuring handheld Anti Drone Guns to prevent Pakistani drones from entering Indian Territory