नवी दिल्ली : कोरोना व्हायरस (coronavirus)चा कहर सुरूच आहे. सीमा सुरक्षा दल (BSF)च्या २ जवानांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. बीएसएफमध्ये काल कोरोनाचे एकूण ४१ प्रकरणं समोर आली आहेत. यानंतर संक्रमण झालेल्या जवानांची एकूण संख्या १९५ झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीएसएफने यावर माहिती देताना म्हटलं आहे, बीएसएफ जवानाची प्रकृती अतिशय गंभीर होती. व्हायरसचं संक्रमण झाल्यानंतर तब्येत आणखी बिघडल्यानंतर त्यांचा इलाज सुरू होता.
 तर दुसऱ्या बीएसएफ जवानाचा मृत्यू ४ मे रोजी सफदरजंग हॉस्पिटलमध्ये झाला आहे. 


या जवानाला ३ मे रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. जनरल वॉर्डमधून आयसीयूमध्ये ४ मे रोजी या जवानाला दाखल करण्यात आलं होतं. या जवानाची कोविड-१९ची टेस्ट मृत्यूनंतर करण्यात आली आणि त्यात हा जवान पॉझिटिव्ह असल्याचं समजलं.