नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सीएए कायद्याचं समर्थन केलं म्हणून बसपा अध्यक्ष मायावती यांनी आपल्याच पक्षाच्या पथेरीया मतदारसंघाच्या आमदार रामबाई परिहार यांना निलंबित केलं आहे. यावर मायावतींची ही कारवाई दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार रामेश्वर शर्मा यांनी दिली आहे. काँग्रेस आणि इतर पक्ष या कायद्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसंच या कायद्याबाबत गैरसमज दूर होऊन अधिकाधिक लोकं या कायद्याला समर्थन देऊ लागल्याचा दावाही रामेश्वर यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बसपाच्या प्रमुख मायावती यांनी ट्विट करत यांची माहिती दिली. बसपा पक्षाविरोधी भूमिका घेतल्याने मायावतींनी ही कारवाई केली आहे. पक्षाच्या कार्यक्रमात भाग घेण्यास ही त्यांना मनाई करण्यात आली आहे. बसपाने या कायद्याच्या विरोधात संसदेत मतदान केलं होतं. पण त्यानंतर ही परिहार यांनी सीसीएच्या बाजुने आपलं मत दर्शवलं होतं.



बहुजन समाज पक्षाने सीएए आणि एनआरसीला विरोध केला आहे. मध्य प्रदेशमधील पक्षाच्या आमदार असलेल्या रामबाई परिहार यांनी मात्र याचं समर्थन केलं होतं. रामबाई परिहार यांनी सीएए आणल्यामुळे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले होते. त्यांनी म्हटलं होतं की, 'हा निर्णय खूप आधी घेतला गेला पाहिजे होता. पण याआधी निर्णय घेण्यात कोणी सक्षम नव्हतं.'