अर्थसंकल्प २०१८ : रेल्वे भाडेवाढीची शक्यता कमी, सुविधांवर असेल जोर!
२०१९ मध्ये होत असलेल्या निवडणुकांपूर्वी मोदी सरकार द्वारे सादर होत असलेल्या अंतिम बजेटमध्ये रेल्वेला काय मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.
नवी दिल्ली : २०१९ मध्ये होत असलेल्या निवडणुकांपूर्वी मोदी सरकार द्वारे सादर होत असलेल्या अंतिम बजेटमध्ये रेल्वेला काय मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.
रेल्वे प्रवाशांना यावेळी दिलासा मिळणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसे रेल्वे प्रवाशाच्या तिकीट दरात वाढ आणि नव्या रेल्वेची घोषणा होणार नसल्याचा अंदाज आहे.
इलेक्ट्रिक इंजिनांच्या निर्माणावर जोर
रेल्वेच्या आर्थिक स्थितीची माहिती त्यांच्या ओआरच्या माध्यमातून मिळते. यातून हे कळतं की, रेल्वे एक रूपया कमवण्यासाठी किती खर्च करते. जर ओआर ९० टक्के आहे तर याचा अर्थ असा की, रेल्वे एक रूपयाची कमाई करण्यासाठी ९० पैसे खर्च करत आहे. येणा-या काही वर्षात इलेक्ट्रिक इंजिनांची वाढती मागणी पाहता रेल्वे वाराणसी येथील डिझेल लोकोमोटीव्ह वर्क्स आणि पटियालाच्या डिझेल कंपोनेंट वर्क्समध्ये इलेक्ट्रिक इंजिनांच्या निर्माणाला प्राधान्य दिलं जाऊ शकतं.
आधुनिकीकरणासाठी ९५ हजार कोटी रूपये
रेल्वेने सर्वच मार्गांवर विद्युतीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि डिझेल इजिंनाला ते हळूहळू बाद करत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक इंजिनांची गरज आहे. बजेटमध्ये रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी ९५ हजार कोटी रूपये मिळणार असण्याचा अंदाज आहे.
रेल्वेत सीसीटीव्ही लावण्याचा विचार
रेल्वे मंत्री पियूष गोयल हे अनेकदा म्हणाले की, रेल्वेने जीबीएसवर निर्भर राहू नये आणि नवीन साधनं निर्माण करावी. आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या बजेटमध्ये सर्वच ११ हजार रेल्वेंमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी ३ हजार कोटी रूपयांचं बजेट दिलं जाऊ शकतं. ज्यात रेल्वेच्या सर्वच ८ हजार ५०० स्टेशनांचा समावेश आहे.