Budget 2019: पाहा कशी असते बजेट बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया
पाहा भारतात बजेट कसा बनवला जातो
नवी दिल्ली : १ फेब्रुवारी २०१९ ला पियुष गोयल अंतरिम बजेट सादर करणार आहेत. बजेट हा शब्द एका फ्रांसिसी शब्दापासून बनला आहे. फ्रांसमध्ये Bougette शब्दाचा अर्थ चामड्याची बॅग असा होतो. यापासून बजेट हा शब्द तयार झाला. या शब्दाचा पहिल्यांदा प्रयोग १८०३ मध्ये फ्रांसमध्ये करण्यात आला होता. १७३३ मध्ये इंग्लंडमध्ये या शब्दाचा वापर जादूची पेटी असा होत होता. त्यानंतर याचा अर्थ बदलला. बजेट हे एक सरकारी कागदपत्र असतं ज्यामध्ये सरकारचा खर्च आणि कमाई याचा हिशोब असतो. यामध्ये १ वर्षाचा हिशोब दिला जातो. याशिवाय सरकार पुढच्या वर्षी किती खर्च करणार आणि कशावर खर्च करणार याबाबत देखील माहिती बजेटमध्ये दिली जाते. यामध्ये भविष्यातील योजनांची देखील घोषणा केली जाते.
बजेट पास करण्यासाठी संसदेची मंजुरी आवश्यक असते. जर सरकार बजेट पेक्षा अधिक खर्च करते तर बजेटचं संशोधित अनुमान देखील सादर करावं लागतं. ज्यावर्षी निवडणूक होते. त्यावर्षी अंतरिम बजेट सादर केलं जातं. सरकार फेब्रुवारीमध्ये बजेट सादर करणार आहे आणि निवडणुका एप्रिल किंवा मे दरम्यान होऊ शकतात. ज्या सरकारचा कार्यकाळ २ महिन्यात संपणार असतो ते सरकार पूर्ण वर्षाचा बजेट नाही सादर करु शकत. पूर्ण बजेट नंतरची सरकार सादर करते.
दरवर्षी सप्टेंबरमध्येच बजेट बनवण्याची प्रक्रिया सुरु होते. यासाठी केंद्र सरकारमधील सर्व विभागांना एक नोटीस पाठवली जाते. यामध्ये विभागाच्या खर्चासंबंधित माहिती विचारली जाते. यानंतर नोव्हेंबरमध्ये अर्थ मंत्रालय वेगवेगळ्या समूहांमध्ये बजेटबाबत बैठका घेते. यामध्ये उद्योगपती, शेतकरी, ट्रेड यूनियन आणि व्यापारी मंडळ असतात. बजेटबाबत त्यांची मागणी विचारली जाते. अर्थ खातं दुसरीकडे सचिव, सीबीडीटी, सीबीईसीच्या अध्यक्षांसोबत बैठक घेते. टॅक्स संदर्भातील सगळे सल्ले टॅक्स रिसर्च यूनिटकडे पाठवले जातात. यानंतर स्टेकहोल्डहरर्सची बैठक होते.
शेवटच्या ७ ते १० दिवसामध्ये बजेटची छपाई सुरु होते. बजेटची छपाई अर्थ मंत्रालयातच होते. या दरम्यान अर्थ मंत्रालयाचे अधिकारी, एक्सपर्ट, प्रिंटिंगशी संबंधित लोकं आणि स्टेनोग्राफर्स अर्थ खात्यातच राहतात. शेवटच्या या दिवसांमध्ये त्यांना कुटुंबासोबत बोलण्याची देखील परवानगी नसते.
बजेट बनवण्याच्या प्रक्रियेवर गुप्तचर विभागाचे अधिकारी नजर ठेवतात. स्टेनोग्राफरवर देखील नजर ठेवली जाते. बजेट आधीच लिक होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते. मोबाईल जॅमरच्या माध्यमातून ते लीक होऊ दिलं जात नाही..बजेट सादर करण्यासाठी आधी सरकार राष्ट्रपतींची मंजुरी घेते. यानंतर कॅबिनेट बैठक होते. यानंतर संसदेत बजेट सादर केलं जातं. सकाळी ११ वाजता अर्थमंत्री संसदेत बजेट सादर करतात.