Budget 2021-22 : देशात नवी राष्ट्रीय रेल्वे योजना सुरु करणार
`कॉमन मॅन`साठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पोतडीमध्ये काय असणार याची उत्सुकता
नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2021-22 चा केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत मांडला जाणार आहे. कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या 'कॉमन मॅन'साठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पोतडीमध्ये काय असेल, याची उत्सुकता आहे.
रोजगार निर्मिती, ग्रामविकासावर भर देताना सर्वसामान्य करदात्यांना अर्थमंत्री दिलासा देऊ शकतात. परकीय गुंतवणूक अधिकाधिक आकर्षित करून वित्तीय तूट भरून काढण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात होऊ शकतो.
यंदाचा अर्थसंकल्प हा अद्वितीय असेल, असं काही दिवसांपूर्वी अर्थमंत्र्यांनी म्हटलं होतं. याची कशी प्रचिती त्या देतात याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय.
जगातील सर्वात वेगानं विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट साध्य करण्याचं आव्हान अर्थमंत्र्यांसमोर असेल.
1 फेब्रुवारी, सकाळी 11 . 37 मिनिटं
देशात नवी राष्ट्रीय रेल्वे योजना सुरु करणार
1 फेब्रुवारी, सकाळी 11 . 29 मिनिटं
कोविड वॅक्सिनसाठी 35 हजार कोटींची तरतूद
1 फेब्रुवारी, सकाळी 11 . 12 मिनिटं
आरोग्यावर 64 हजार कोटींची तरतूद
1 फेब्रुवारी, सकाळी 11 . 10 मिनिटं
17 नवे पब्लिक हेल्थ युनिट स्थापन केले जाणार
1 फेब्रुवारी, सकाळी 11 . 08 मिनिटं
25 हजार 180 कोटींची तरतूद आरोग्य केंद्र उभारण्यासाठी
1 फेब्रुवारी, सकाळी 11 . 06 मिनिटं
17 हजार ग्रामीण आणि 11 हजार शहरी आरोग्य केंद्र- नॅशनल हेल्थ मिशनद्वारे सहाय्य केलं जाणार
1 फेब्रुवारी, सकाळी 11 . 04 मिनिटं
मिशन पोशन 2.0 आज नव्यानं लाँच केलं जात आहे. पोषण आहारासाठी ही नवीन योजना सुरू केली जाणार आहे.
1 फेब्रुवारी, सकाळी 11 . 04 मिनिटं
1 फेब्रुवारी, सकाळी 11 . 04 मिनिटं
अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात
1 फेब्रुवारी, सकाळी 9. 40 मिनिटं
Budget 2021 आधी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 406 अंकांनी वधारला.
1 फेब्रुवारी, सकाळी 9.39 मिनिट
निर्मला सितारमण मेड इन इंडीया टॅबमध्ये बजेट सादर करतील
1 फेब्रुवारी, सकाळी 9.37 मिनिट
कोरोना साथीच्या आणि लॉकडाऊनमुळे सर्वाधिक परिणाम झालेल्या क्षेत्रांमध्ये देशातील एमएसएमई (सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग) क्षेत्राचा समावेश आहे. या क्षेत्रात मोठ्या संख्येने लोकांच्या नोकर्या गेल्या. अशा परिस्थितीत सरकार अर्थसंकल्पात एमएसएमई क्षेत्रासाठी मदत पॅकेज जाहीर करू शकेल अशी अपेक्षा आहे.
1 फेब्रुवारी, सकाळी 9.30 मिनिट
1998-2003 दरम्यान आर्थिक विकास दरात घट झाली. पण त्या संकटातही सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पायाभूत सुविधांवर खर्च करण्यात आला. टेलिकॉम क्षेत्रात सुधारणा घडवून आणल्या, त्यामुळे विकासाला वेग आला. सरकारी खर्च वाढवावा लागेल हे आम्ही इतिहासातील अनुभवातून शिकलो. विकास दर वाढविण्यासाठी सरकार कठोर पावले उचलू शकते, असे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे.
1 फेब्रुवारी, सकाळी 9.27 मिनिट
कोरोना काळात सादर होत असलेल्या या अर्थसंकल्पात सरकार देशाच्या आरोग्य बजेटमध्ये वाढ करू शकेल अशी अपेक्षा आहे.
1 फेब्रुवारी, सकाळी 9.20 मिनिट
आरोग्य कामगारांची संख्या वाढविण्यासाठी, कौशल्य विकासासाठीही सरकार घोषणा करू शकते. लसीकरणासाठी सरकार बजेटमध्ये निधी वाटप करू शकते.
1 फेब्रुवारी, सकाळी 9.00 मिनिट
आयकर कायद्याच्या कलम 80 डी अंतर्गत आरोग्य विम्यालाही सूट मिळू शकते. मोफत लससाठी काही पैसे उभे करण्याचा प्रयत्न सरकार करू शकेल अशीही अपेक्षा आहे. यासाठी काही करातही वाढ केली जाऊ शकते.
1 फेब्रुवारी, सकाळी 8.37 मिनिट
कोरोना महामारी देखील संकटाच्या रूपाने आली आहे. ज्यामुळे रेल्वेची चाके थांबली अशा परिस्थितीत हे बजेट सर्व क्षेत्रांचे हित लक्षात घेऊन बनविण्यात आले आहे.
1 फेब्रुवारी, सकाळी 8.37 मिनिट
गेल्या वर्षातील वित्तीय तूट कमी करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल असेही कृष्णमूर्ति सुब्रमण्यन (Krishnamurthy Subramanian) यांनी म्हटलंय.
1 फेब्रुवारी, सकाळी 8.37 मिनिट
सरकार ने V शेप्ड रिकवरी प्लान बनवलाय. शॉर्ट टर्म पेन (Short Term Pain) घेऊन लॉन्ग टर्म गेन (Long Term Gain) वर सरकारने जोर दिलाय. इसलिए बड़े आर्थिक सुधार आणण्यासाठी 5 ट्रिलियन डॉलरचे लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न बजेटमध्ये होऊ शकतो.
1 फेब्रुवारी, सकाळी 8.37 मिनिट
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प 2021 me"r Union Budget Mobile App लॉन्च केलंय. भारत सरकारचे हे ऍप तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरुन (Google App Store) डाउनलोड करु शकता. ऍप स्टोरमध्ये जाऊन Union Budget टाइप करा. ज्याच्याखाली NIC eGov Mobile Apps लिहिले असेल ते ऍप डाऊनलोड करा. किंवा तुम्ही थेट www.indiabudget.gov.in वर जाऊन देखील ऍप मिळवू शकता.
1 फेब्रुवारी, सकाळी 8.8 मिनिट
जानेवारी महिन्यात जीएसटी संकलनाचे आकडे १ लाख २० हजार कोटींच्या घरात पोहचलंय. अनलॉकनंतर अर्थव्यवस्था वेगानं पूर्वपदावर येत असल्याचा हा संकेत आहे. विशेष म्हणजे २०१७मध्ये जीएसटी लागू झाल्यापासूनचे हे सर्वाधिक जीएसटी संकलन असल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालानं स्पष्ट केलंय.
1 फेब्रुवारी, सकाळी 7.40 मिनिट
केंद्रीय अर्थमंत्री सकाळी 11 वाजता संसदेत बजेट सादर करतील. सकाळी 9 वाजता त्या राष्ट्रपती भवनात पोहोचतील.
1 फेब्रुवारी, सकाळी 7.30 मिनिटं
संसद भवनात फोटोसेशननंतर 10 वाजून 15 मिनिटांनी बजेटवर मंजुरी घेतली जाईल.
1 फेब्रुवारी, सकाळी 7.20 मिनिटं
सकाळी 9 वाजता बजेटसाठी राष्ट्रपती भवनात निघण्यापुर्वी एक फोटोसेशन होईल.