नवी दिल्ली : Union Budget 2022 : कोरोना काळात मोठा फटका बसल्याने यावेळी अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र, घोर निराशा झाली आहे. कारण अर्थसंकल्पात कर रचनेत (income tax)कोणताही बदल करण्यात आलेला नाही. करदात्यांसाठी नवीन आणि जुनी अशा दोन कर रचना कायम ठेवण्यात आली आहे. गेल्या अर्थसंकल्पात देखील प्राप्तिकर रचनेत कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे करदात्यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. (Budget 2022: No change in income tax, no relief to taxpayers)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी  त्या सर्वसामान्यांना दिलासा देण्याची घोषणा करतील अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली आहे. तब्बल दीड तास निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाचं वाचन केले. गेल्या दोन वर्षात कोरोनाचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य करदात्यांना दिलासा मिळेल असे वाटत होते. पण कररचनेत कोणतेही बदल न झाल्याने पुन्हा एकदा पदरी निराश पडली आहे. गेल्या सहा वर्षांपासून कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.


अर्थसंकल्पात प्राप्तिकरासंबंधी अनेक अपेक्षा करदात्यांनी केल्या होत्या. प्राप्तिकर अधिनियमच्या 80 क अंतर्गत 150,000 रुपयांच्या सध्याच्या मर्यादेवर कर सवलत वाढवण्याची मागणी होती. तसे काहीही झालेले नाही. कोरोना काळात वेतन कपातीमुळे तसेच घरून काम करण्याच्या वातावरणात नोकरी करण्यासाठी अतिरिक्त खर्च केला. त्यामुळे पगारदार कर्मचारी प्राप्तिकर सवलतीची अपेक्षा करु लागला होता. मात्र या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत.


नवी कर रचना


 


उत्पन्न

आयकर (टक्के)

5 लाखांपर्यंत 0
5 लाख ते 7.5 लाखांपर्यंत 10
7.5  लाख ते 10 लाखांपर्यंत 15
10  लाख ते 12.5 लाखांपर्यंत 20
12.5 लाख ते 15 लाखांपर्यंत 25
15 लाखांहून अधिक 30

 


जुनी कर रचना


उत्पन्न

कर (टक्के)

2.5 लाखांपर्यंत 0
2.5 लाख ते 5 लाखांपर्यंत 5
5  लाख ते 10 लाखांपर्यंत 20
10 लाखांहून अधिक 30