Gati Shakti | देशाच्या विकासाला मिळणार 7 इंजिनची गती शक्ती; अर्थमंत्र्यांची घोषणा
Pm gati shakti plan : अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी `PM गति शक्ती योजने`चे सरकारचा मास्टर प्लॅन म्हणून वर्णन केले आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, देशाच्या आर्थिक विकासाचे इंजिन असलेल्या सात सूत्रांच्या आधारे ही योजना अंमलात आणली जाणार आहे.
मुंबई : अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी 'PM गति शक्ती योजने'चे सरकारचा मास्टर प्लॅन म्हणून वर्णन केले आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, देशाच्या आर्थिक विकासाचे इंजिन असलेल्या सात सूत्रांच्या आधारे ही योजना अंमलात आणली जाणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान गती शक्ती योजना देशाच्या विकासासाठी महत्त्वाची असल्याचे सांगितले.
अर्थमंत्र्यांनी पीएम गति शक्तीचा सरकारचा मास्टर प्लॅन असल्याचे वर्णन केले. या योजनेची सात सुत्रे रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदरे, वाहतूक, जलमार्ग, लॉजिस्टिक इन्फ्रा यांचा समावेश आहे.
अर्थमंत्र्यांनी सांगितले की, "लोकांची आणि मालाची जलद वाहतूक सुलभ करण्यासाठी 2022-23 मध्ये एक्सप्रेसवेसाठी PM गति शक्ती मास्टर प्लॅन तयार केला जाईल.
2022-23 मध्ये राष्ट्रीय महामार्ग 25,000 किमी पर्यंत वाढवले जाईल. सार्वजनिक संसाधनांना पूरक म्हणून 20,000 कोटी खर्च केले जातील.