Budget 2022: बजेट समजून घेताना काय होतंय Google वर सर्च?
यंदाच्या अर्थसंकल्पाबाबत लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. या उत्सुकतेपोटी लोकं गुगलवर सर्च करतायत. जाणून घेऊया बजेटशी संबंधित लोक Google वर नेमकं काय सर्च करतायत.
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2022 रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यासाठी जवळपास सर्व तयारी करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पाकडून देशातील जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत. तज्ज्ञांच्या मते, यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या आणि विशेष गोष्टी घडू शकतात. या वर्षी अनेक मोठ्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत, त्याशिवाय देशात कोरोनाची तिसरी लाटही सुरू आहे. या सर्व मुद्द्यांचा विचार करता अर्थसंकल्प सादर केला जाऊ शकतो.
यंदाच्या अर्थसंकल्पाबाबत लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. या उत्सुकतेपोटी लोकं गुगलवर सर्च करतायत. जाणून घेऊया बजेटशी संबंधित लोक Google वर नेमकं काय सर्च करतायत.
बजेटचा अर्थ
गुगलवर लोक बजेटचा अर्थ लोकं सर्च करतायत. बजेट हा शब्द फ्रेंच शब्द तो bougette पासून आला आहे. ज्याचा अर्थ आहे- लहान पिशवी असा आहे. सरकार दरवर्षी 1 एप्रिल ते ३१ मार्च दरम्यान झालेल्या खर्चाचा हिशेब तयार करतं, ज्याला केंद्रीय अर्थसंकल्प म्हणतात.
बजेटचे प्रकार
प्रकारचे किती प्रकार आहे याबाबतही सध्या मोठ्या प्रमाणात सर्च केलं जातंय. साधारणपणे बजेटचे तीन प्रकार असतात, बॅलन्स्ड बजेट, सरप्लस बजेट आणि डेफिसिट बजेट. बॅलन्स बजेटमध्ये उत्पन्न आणि खर्चाची रक्कम समान असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सरप्लस बजेटमध्ये सरकारचं उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असतं. डेफिसीट बजेटमध्ये सरकारचा खर्च त्याच्या उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा जास्त असतो.
बजेटची तारिख 2022
अर्थसंकल्प कधी सादर होणार हेही लोकांनी गुगलवर सर्च केलंय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता संसदेत आपला चौथा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
देश सध्या कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटशी लढा देतोय. अशा परिस्थितीत लोकांना सरकारकडून दिलासादायक बजेटची अपेक्षा आहे. स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50,000 रुपयांवरून 1 लाख रुपये करण्याची मागणी आहे. कोरोनाच्या काळात घरून काम करणाऱ्यांना अतिरिक्त कर सवलत देण्याचीही सूचना करण्यात आली आहे. याशिवाय पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पाहता जनतेला आकर्षित करण्याचाही प्रयत्न केला जाऊ शकतो.