Budget 2024 Economic Survey: बजेट सत्राच्या पहिल्या दिवशी संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्व्हेक्षण सादर केले. उद्या 23 जुलै रोजी निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प जाहीर करतील. या पार्श्वभूमीवर संसदेत इकोनॉमिक सर्व्हे सादर करण्यात आला. त्यानुसार 2023-24 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 9.7 टक्क्यांची वाढ दिसत असल्याचा दावा सरकारनं केलाय. या आधीच्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेची वाढ 7 टक्के इतकी होती. या तुलनेत महागाई थोडीफार वाढली आहे. पण सर्व कॅटेगरी एकत्र पाहिल्या तर महागाई नियंत्रणात असल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. 


मुख्य आर्थिक सल्लागाराच्या देखरेखीखाली तयार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थ मंत्रालयाचा इकोनॉमिक अफेयर्स विभागाअंतर्गत येणारे इकोनॉमिक डिव्हिजन आर्थिक सर्व्हे तयार करते. मुख्य आर्थिक सल्लागारांच्या देखरेखीखाली हा सर्व्हे तयार केला जातो. 1950-51 मध्ये पहिला आर्थिक सर्व्हे सादर करण्यात आला होता. 1664 पर्यंत बजेटसोबतच आर्थिक सर्व्हे सादर केला जायचा. यानंतर यात बदल करण्यात आला. अर्थसंकल्पाच्या 1 दिवस आधी आर्थिक सर्व्हे सादर करण्यात येऊ लागला. आर्थिक सर्व्हेमध्ये गेल्यावर्षीचा लेखाजोखा आणि येणाऱ्या वर्षात अर्थव्यवस्थेसाठी लागणाऱ्या सुचनांचा यात समावेश असतो. 


2014 साली आर्थिक सर्व्हे 2 वॉल्यूममध्ये सादर करण्यात आला.पहिल्या वॉल्यूममध्ये अर्थव्यवस्थेच्या आव्हानांवर लक्ष केंद्रीत केले जाते.दुसऱ्या वॉल्यूममध्ये अर्थव्यवस्थेच्या सर्व खास सेक्टर्सचा रिव्ह्यू केला जातो.  


कधी सादर होणार अर्थसंकल्प?


सोमवारपासून म्हणजेच 22 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यावेळी, अर्थमंत्री निर्मला सीतारामण मंगळवारी म्हणजेच 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आर्थिक सर्वेक्षण लोकसभेत दुपारी 1 वाजता आणि राज्यसभेत दुपारी 2 वाजता सादर केला जाईल. पण आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय असतं? आर्थिक सर्वेक्षणात नेमकं काय असतं? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.  


अर्थसंकल्पाआधी पेट्रोलचे दर 


अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधीच म्हणजेच सोमवारी देशातील अनेक शहरांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट झाल्याचे चित्र आहे. उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात आज इंधनच्या दरात घट झाल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही कच्चा तेलाच्या किंमतीत घट झाल्याचे पाहायला मिळतेय. मात्र, देशातील चार महानगरांत कोणताही बदल झालेला पाहायला मिळत नाहीये. सरकारी तेल कंपन्यांनुसार, उत्तर प्रदेशच्या गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात पेट्रोल 15 पैशांनी स्वस्त होऊन 94.66 रुपये प्रति लिटर आहे. तर, डिझेल 18 पैशांनी कमी होऊन 87.76 रुपये लीटर झाले आहे. गाझियाबादमध्ये पेट्रोल 12 पैशांनी कमी होऊन 94.53 रुपये आणि डिझेल 14 पैशांनी कमी होऊन 87.61 रुपये प्रति लीटर इतके झाले आहे. हरियाणाची राजधानी गुरुग्राममध्ये पेट्रोल 14 पैशांनी स्वस्त होऊन 87.83 लीटरने विक्री केली जात आहे.