Budget 2025: नोकरदारवर्गासाठी खुषखबर! स्टॅंडर्ड डिडक्शन वाढववून `इतके`लाख करण्याची तयारी
Budget 2025: आर्थिक वर्ष 2025 चा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2025 ला सादर केला जाणार आहे.
Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी 23 जुलै 2024 रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्प 2024-25 मध्ये मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला होता. त्यावेळी सरकारकडून स्टॅंडर्ड डिडक्शनची मर्यादा 50 हजार रुपयांनी वाढवून 75 लाख रुपये केली होती. सरकारने स्टॅंडर्ड डिडक्शनच्या माध्यमातून न्यू टॅक्स रिजिम निवडणाऱ्यांना दिलासा दिला होता. ओल्ड टॅक्स रिजिममध्ये दिलासा मिळावा, अशी मागणी नोकरदार वर्गाकडून खूप मोठ्या काळापासून केली जात आहे. आर्थिक वर्ष 2025 संदर्भात अर्थ विभागाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अधिकाऱ्यांसोबत महत्वाच्या मिटिंग केल्या आहेत.
बजेटमध्ये मध्यमवर्गीयांसाठी काय खास?
आर्थिक वर्ष 2025 चा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2025 ला सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण सादर करणार असलेला हा आठवा अर्थसंकल्प असेल.पुढच्यावर्षी फेब्रुवारीमध्ये सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना पुन्हा इनकम टॅक्समध्ये दिलासा दिला जाण्याची शक्यता आहे. मध्यम वर्गीयांमध्ये इनकम टॅक्स भरणाऱ्या नोकरदार वर्गाची संख्या मोठी आहे.
स्टॅंडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवण्यावर विचार
समोर आलेल्या दैनिक जागरणच्या रिपोर्ट्सनुसार, यावेळेस नोकरदार वर्गाला दिलासा देण्यासाठी अर्थमंत्रालय इनमक टॅक्सच्या न्यू टॅक्स रिजीमअंतर्गत स्टॅंडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवण्यावर विचार करु शकते. सध्याच्या आर्थिक वर्षात न्यू टॅक्स रिजीम अंतर्गत नोकरदारवर्गाला 75 हजार रुपयांच्या स्टॅंडर्ड डिडक्शनचा फायदा मिळणार आहे. याशिवाय 7 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असेल्यांना न्यू टॅक्स रिजीम अंतर्गत कोणता टॅक्स द्यावा लागत नाही.
ओल्ड रिजीममध्ये नाही मिळणार दिलासा!
सुत्रांनी केलेल्या दाव्यानुसार, 1 फेब्रुवारी 2025 ला सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात नोकरदार वर्गासाठी स्टॅंडर्ड डिडक्शनची मर्यादा 75 हजार रुपयांनी वाढवून 1 लाख रुपयांपर्यंत केली जाऊ शकते. यासोबतच सरकार न्यू टॅक्स रिजिम अंतर्गत इनकम टॅक्समध्ये काही प्रमाणात दिलासा देऊ शकते. सरकारकडून न्यू टॅक्स रिजिमला प्रोत्साहन देण्यात येतेय. अर्थ मंत्रालयाने वेळोवेळी याचे संकेत दिले आहेत.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भरलेल्या 8 कोटी इनकम टॅक्स रिटर्नमध्ये वार्षिक 5 ते 10 लाख कमावणाऱ्या आयटीआरची संख्या 2.79 कोटी असेल. याशिवा 10 ते 20 लाख रुपये पगार असलेल्यांनी 89 लाख आयटीआर भरले. सरकारने इनकम टॅक्समध्ये दिलासा देण्याचा निर्णय घेतला तर साधारण 3 कोटी टॅक्सपेयर्सनाही दिलासा दिला जाऊ शकतो.