Share Market Update For 1st Feb: 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पाचा परिणाम शेअर मार्केटवर होताना आपण पाहिले असेल. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर काही शेअर्सच्या किंमती उसळी घेतात तर काही शेअर्सच्या किंमती कोसळतात. भारतीय शेअर मार्केटमध्ये आपल्याला याचे परिणाम दिसतात. यावेळचा अर्थसंकल्प सादर होत असताना 1 फेब्रुवारी रोजी शनिवार आहे. शेअर मार्केट सर्वसाधारणपणे शनिवार आणि रविवारी बंद असतो. अशावेळी अर्थसंकल्प जाहीर होत असताना शनिवारी शेअर मार्केट सुरु राहणार की बंद? असा प्रश्न अनेकांना पडलाय. याबद्दल जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 फेब्रुवारीसंदर्भात नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी शेअर बाजार सुरु होईल आणि दुपारी साडेतीन वाजेपर्यंत खुला राहील, असे नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे. 


शनिवारी केव्हा खुलणार शेअर बाजार? 


सर्वसाधारणपणे शेअर बाजार आठवड्याचे शेवटचे 2 दिवस म्हणजेच शनिवार आणि रविवारी बंद राहतो. पण काही खास दिवशी खुला राहतो. 1 फेब्रुवारी रोजी देशाचा बजेट असल्याने शेअर बाजार सुरु राहील, असे एनएससीने म्हटलंय. 


त्याचप्रमाणे याआधी 1 फेब्रुवारी 2020 आणि 28 फेब्रुवारी 2015 रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात आला तेव्हा शनिवार होता.  त्या दिवशी बाजार खुला होता. अर्थसंकल्प सादरीकरणाच्या दिवशी बाजार सुरू होण्यापूर्वी ज्यांना ट्रेडींग करायचे आहे त्यांच्यासाठी बाजार सकाळी 9 वाजल्यापासून खुला राहील.


एका नोटिफिकेशननुसार, बीएसई निर्देशांकाची गणना 1 फेब्रुवारी 2025 (शनिवार) रोजी देखील केली जाईल. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मुळे एक्सचेंजने हा दिवस विशेष ट्रेडींग दिवस म्हणून घोषित केला आहे. नियमित व्यवहार वेळेत बाजार खुला राहील. याबद्दल अधिक माहिती पुढे देण्यात आली आहे.


ब्लॉक डील मीटिंग-1 सकाळी 8.45 ते 9 दरम्यान असेल. विशेष प्री-ओपन सत्र (आयपीओ आणि सूचीबद्ध सिक्युरिटीजसाठी): सकाळी 9 ते 9.45 दरम्यान असेल. कॉल ऑक्शन इलक्विड सेशन (प्रत्येकी 1 तासाचे 6 सेशन) सकाळी साडे नऊ ते दुपारी साडे तीन दरम्यान असेल.  ब्लॉक डील मीटिंग-2 दुपारी 2.5 ते 2.20 दरम्यान असेल. पोस्ट क्लोजिंग सेशन दुपारी 3.40 ते 4 वाजेपर्यंत असेल. ट्रेड मॉड‍िफ‍िकेशन कट ऑफ टाइम संध्याकाळी सव्वा चारपर्यंत असणार आहे.