नवी दिल्ली :  दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली. शुक्रवारी सोने ५० रुपयांच्या वाढीसर प्रति १० ग्रॅमसाठी ३१२५० रुपयांच्या स्तरावर आला. किंमतीमधील वाढीमुळे स्थानिक ज्वेलर्सने मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे तसेच सकारात्म वैश्विक संकेतामुळे ही वाढ दिसून आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच चांदीच्या दरातही १५० रुपयांची वाढ दिसून आली. प्रति किलो चांदी ३९२०० रुपये झाली आहे. औद्योगिक मागणी आणि शिक्के निर्मात्यांकडून आलेली मागणी यामुळे चांदीतही तेजी दिसू आली. 


व्यापाऱ्यानुसार डॉलरमध्ये घसरण आल्यामुळे सोन्या-चांदीसाठी सकारात्मक वैश्विक संकेत मिळाले. घरगुती बाजारात स्थानिक ज्वेलर्सनी लग्नाच्या सीझनची मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. वैश्विक पातळीवर सिंगापूरमध्ये सोने ०.४८ टक्क्यांनी वाढत १६.४३ डॉलर प्रति औंस झाली आहे. 


मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ३११५० रुपये आहे.  तर २२ कॅरेट सोन्याची किंमत २९१०० रुपये आहे.