बुरारी आत्महत्या प्रकरण : पोस्टमार्टम रिपोर्ट हाती, ११ पैकी १० लोकांच्या मृत्यूचे रहस्य उलगडले
राजधानी दिल्लीतील ११ जणांच्या मृत्यूबाबत दिवसागणिक अनेक धक्कादायक बाबी पुढे येत आहेत.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील ११ जणांच्या मृत्यूबाबत दिवसागणिक अनेक धक्कादायक बाबी पुढे येत आहेत. बुराडीच्या संत नगरमध्ये बुरारी कुटुंबातील ११ लोकांच्या रहस्यमय मृत्यूनंतर काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या हाती आणखी एक डायरी लागली आहे. यात प्रेम प्रकणातून असे कृत्य झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान, रोज या प्रकरणात नवीन नवीन खुलासे होत आहेत. आता पोस्टमार्टम रिपोर्टनुसार १० लोकांचा मृत्यू गळफास लावून फाशीने झाल्याने पोलिसांनी म्हटलेय. तर ज्येष्ठ आणि वयोवृद्ध महिला नारायण देवींच्या पोस्टमॉर्टमचा अहवाल हाती आलेला नाही. त्यामुळे त्यांचा कसा मृत्यू झाला, याची माहिती उपलब्ध झालेली नाही.
नारायणी देवी यांची मृतदेह खोलीत जमिनीवर पडलेला होता. यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांचे एकमत झालेले नाही. म्हणून मंगळवारी डॉक्टरांच्या टीमने भाटिया यांच्या घराला भेट दिली. त्यानंतर डॉक्टरांची टीम चर्चा करणार आहे. त्यानंतर अंतिम अहवाल सादर करणार आहे. त्यामुळे नारायणी देवी यांच्या मृत्यूचे कारण समजू शकणार आहे.
याआधी भाटिया कुटुंबाची वही सापडली. या वहीत वडिलांचा आत्मा भटकत असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या आदेशानुसार हे कुटुंब पुढील दिवाळी पाहू शकेल का, याबाबत शंका व्यक्त करण्यात आली होती. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांने सांगितले की, दिवंगत ललित सिंग चुंडावत यांच्या शरीरात कथित स्वरुपात वडिलांचा आत्मा येत होता. तो वडिलांप्रमाणे वागत होता. त्यानेच ती सुसाइड नोट लिहीली होती.
दरम्यान, सामूहिक आत्महत्या प्रकरणाचे गूढ होते. बुरारी सामूहिक हत्याप्रकरणी तांत्रिक महिलेला अटक करण्यात आलेय. त्यामुळे या आत्महत्येमागे तांत्रिक मांत्रिक गोष्टी आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, भाटिया कुटुंबाने यापूर्वी तब्बल सहा वेळा सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असा गौप्यस्फोट करण्यात आला होता. भाटिया कुटुंबाने दीड वर्षांपूर्वी उज्जैन येथे जाऊन तंत्र-मंत्रांची साधना केली होती अशीही माहिती समोर आली होती.
बुरारी सामूहिक आत्महत्या प्रकरणी रोजच नवनवे गौप्यस्फोट होताना दिसत आहेत. या आत्महत्या प्रकरणामागे अंधश्रद्धा आणि तंत्र-मंत्राचा हात असल्याची शक्यता आता व्यक्त करण्यात येत आहे. तांत्रिक महिलेला अटक करण्यात आली आहे. पोलीस सध्या तिची कसून चौकशी करत आहेत. याच प्रकरणी क्राईम ब्रांचचे अधिकारी भाटिया कुटुंबाशी संबंधित एका तांत्रिक महिलेचा शोध घेत होते. अखेर हा शोध संपला आहे.
अटक करण्यात आलेली महिला ही भाटिया कुटुंबाचे घर बांधणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरची बहीण आहे. भाटिया कुटुंबाने आत्महत्या करण्यापूर्वी कुटुंबातील मुख्य आणि आत्महत्येचा कट रचणारा ललित याने आत्महत्येपूर्वी आपल्या कॉन्ट्रॅक्टरला फोन केल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचे नाव गीता असून आपण भूत-प्रेत पळवून लावण्यामध्ये कुशल असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, यापूर्वी पोलिसांच्या हाती २८ जूनचे सीसीटीव्ही फुटेज लागले होते. यात सायंकाळी ७.३५ च्या दरम्यान भाटिया कुटुंबातील छोटा मुलगा ललित याची पत्नी टीना, आणि भुप्पीचा मुलगा ध्रुव घराजवळ असणाऱ्या फर्निचरच्या दुकानातून ४ टेबल आणताना दिसत आहेत. याच टेबलचा वापर करुन संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली.