EPFO | पीएफ अकाऊंट असणाऱ्यांना मिळणार बंपर दिवाळी गिफ्ट; असे करा चेक
या दिवाळीत EPFO आपल्या 6 कोटीहून अधिक सब्सक्राइबर्सला गिफ्ट देणार आहे.
मुंबई : या दिवाळीत EPFO आपल्या 6 कोटीहून अधिक सब्सक्राइबर्सला गिफ्ट देणार आहे. लवकरच PF अकाऊंटमध्ये व्याज ट्रान्सफर होणार आहे. तुम्ही तुमच्या PF अकाऊंटमध्ये आलेले व्याज चेक करू शकता. लाभार्थ्यांना 8.5 टक्के व्याज लवकरच EPFO सब्सक्राइबरच्या अकाऊंटमध्ये जमा होईल.
8.5 च्या व्याजदरासाठी मिळाली मंजूरी
कॅबिनेट मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली EPFOच्या क्रेंद्रीय न्यासी बोर्डने या वर्षी मार्चमध्ये 2020-21 मध्ये मागील वर्षीप्रमाणे 8.5 टक्क्यांचा व्याजदराला मंजूरी दिली आहे. श्रम मंत्रालयाला प्रस्तावित दरावर वित्त मंत्रालयातून मंजूरी घेणे गरजेचे असेल.
श्रम मंत्रालयातील उच्च अधिकाऱ्यांनी वित्त मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिल्यानंतर ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येणार असल्याचे म्हटले.
व्याजदर 7 वर्षांच्या खाली
मागील वर्षी 2019-20 मध्ये केवायसीमध्ये झालेल्या गोंधळामुळे सब्सक्राइबर्सला जास्त वाट पाहावी लागली होती. ईपीएफओने वित्त वर्ष 2020-21 मध्ये व्याजदरांना विना बदलाचे 8.5 टक्क्यांवर जैसे थे ठेवले. हे व्याजदर गेल्या 7 वर्षातील सर्वात कमी व्याजदर आहेत. तुम्ही घरबसल्या सोप्या पद्धतीने तुमचे अकाऊंट बॅलेन्स चेक करू शकता.
मिस्ड कॉलच्या माध्यमातून चेक करा बॅलेन्स
तुम्हाला तुमच्या पीएफचे पैसे चेक करण्यासाठी आपल्या रिजस्टर्ड मोबाईल नंबर वरून 01122901406 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल. त्यानंतर ईपीएफओच्या मॅसेजच्या माध्यमातून तुम्हाला पीएफ डिटेल मिळेल. त्यासाठी तुमचा UAN पॅन आणि आधार लिंक असणे गरजेचे आहे.