SBI देतेय पैसे कमवण्याची सुवर्णसंधी; महिन्याला होईल 80 हजार रुपयांची कमाई
SBI Business Idia : आज आम्ही तुम्हाला एक असा योग्य मार्ग सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला महिन्याला 80 हजार रुपये कमवण्याची संधी मिळणार आहे.
मुंबई : पैसे कमवायचे आहेत, पण नेमकं काय करावं? कोणता व्यवसाय सुरु करावा? यांसारखे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर काळजी करु नका. आज आम्ही तुम्हाला एक असा योग्य मार्ग सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला महिन्याला 80 हजार रुपये करमवण्याची संधी मिळणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियची एटीएम फ्रेंचाइजी
देशातली सर्वात लोकप्रिय आणि सार्वजनिक क्षेत्रातील नामांकित असलेली SBI (State Bank of India) एटीएमची फ्रेंचाइजी (SBI ATM Franchise) घेऊन तुम्ही महिन्याचे तब्बल 80 हजार रुपये कमवू शकता. एसबीआय एटीएम फ्रेंचाइजी ही बँकेकडून थेट घेता येत नाही तर बँकेकडून एटीएम फ्रेंचाइजीसाठी कॉंट्रॅक्ट काढले जाते. एटीएम फ्रेंचाइजीसाठी ज्या कंपनीने कॉंट्रॅक्ट घेतले आहे त्या कंपनीकडून तुम्ही फ्रेंचाइजी घेऊ शकता आणि पैसे कमवू शकता.
SBI ATM ची फ्रेंचाइजी घेण्यासाठी काय अटी आहेत?
1. एसबीआय एटीएमची फ्रेंचाइजी घेण्यासाठी तुमच्याकडे 50-80 स्क्वेअर फूट जागा असणे अवश्यक आहे.
2. दुसऱ्या एटीएमचं अंतर 100 फूटांचं असावं.
3. ही जागा स्पेस ग्राउंड फ्लोर आणि गुड विजिबिलिटी असणारी असावी.
4. त्या ठिकाणी 24 तास पॉवर सप्लाय असावी आणि त्याव्यतिरिक्त 1 किलोवॅटचं वीजेचं कनेक्शन असायला हवं.
5. त्या एटीएमद्वारे प्रत्येक दिवशी जवळपास 300 ट्रांजेक्शन होण्याची क्षमता असायला हवी.
6. एटीएमच्या जागेवर कॉंक्रीटचं छत असायला हवं.
7. V-SAT लावण्यासाठी सोसायटी किंवा अथॉरिटीकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (NOC) असायला हवं.
SBI ATM ची फ्रेंचाइजी घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
1. ओळखपत्र - Aadhaar Card , Pan Card , Voter Card
2. अॅड्रेस प्रूफ - रेशन कार्ड, वीजबील
3. बँक अकाउंट आणि पासबूक
4. फोटोग्राफ, ई-मेल आयडी, फोन नंबर
5. जीएसटी नंबर
6. फायनांशिअल डॉक्यूमेंट्स
7. इतर डॉक्यूमेंट्स