अवघ्या 5-5 रुपयांचे रिंग्स विकणारा `हा` माणूस आहे 3200 कोटींचा मालक, कधीकाळी बसच्या तिकीटाचेही नव्हते पैसे!
Business News : नशीबाला कधी कलाटणी मिळेल याचा काहीच नेम नसतो. या व्यक्तीच्या बाबतीतही असंच झालं. गरिबीतून श्रीमंतीपर्यंतची या व्यक्तीची वाटचाल हेवा वाटण्याजोगीच.
success story : नशीब आपल्याला शक्य ते सगळे दिवस दाखवतं आणि ही बाब कोणीही नाकारू शकत नाही. येणारा दिवस म्हणजे आयुष्यानं आपल्याला दिलेली नवी संधीच आहे असं म्हणत प्रत्येत दिवसाचं सोनं करण्यासाठीच प्रयत्न करणं इतकंच काय ते आपल्या हातात असतं. आपण इथं ज्या व्यक्तीविषयी जाणून घेणार आहोत त्यानंही तेच केलं. स्नॅक्स, नमकीन बनवणाऱ्या प्रताप स्नॅक्स या कंपनीच्या शेअरला गुरुवारी शेअर बाजारात 13 टक्क्यांची उसळी मिळाली आणि आता या कंपनीमध्ये हल्दीरामही मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत दिसत आहे.
येलो डायमंड या ब्रँडच्या अंतर्गत प्रताप स्नॅक्स ही कंपनी नमकीन, स्नॅक्स, वेफर्सची विक्री करते. 2017 मध्ये लिस्ट झालेल्या या कंपनीची गेल्या वर्षीची एकूण कमाई 20 कोटी डॉलर इतकी होती. 3,272.22 कोटी रुपयांचा मार्केट कॅप इतका आहे. कंपनीचे एमडी आणि सीईओ अमित कुमत यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मेहनतीमुळंच हे सर्व साध्य झालं आहे.
गतकाळात डोकावताना...
1990 मध्ये अमित कुमत अमेरिकेमध्ये शिकत असताना तिथं पापड मिळत नव्हते. त्यामुळं इथं ते दुधाची तहान ताकावर म्हणजेच पापडाची भूक वेफर्सवर भागवत होते. शिक्षणानंतर मायदेशी परतल्यानंतर त्यांना अपेक्षित नोकरी मिळाली नाही. सरतेशेवटी त्यांनी वडिलांना व्यवसायामध्ये हातभार लावण्यास सुरुवात केली. काळ पुढं आला, 1996 ते 1999 दरम्यान त्यांनी केमिकल डायच्या व्यवसायाच उडी मारली.
अनेक उद्योगधंदे डबघाईला गेले आणि त्यामध्ये कुमत यांच्यावर 18 कोटी रुपयांचं कर्ज झालं. तो काळ इतका वाईट होता की त्यांच्याकडे बसप्रवासाच्या तिकीटाचेही पैसे नव्हते. इथं एक वेगळीच पायपीट सुरु असताना अमित कुमत यांच्या मोठ्या भावाच्या मित्रापुढे कौटुंबीक स्नॅक्स उद्योगामध्ये 15 लाखांची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव ठेवला. अरविंद मेहता, अपूर्व कुमत आणि अमित कुमत यांनी लखनऊ येथे चीज बॉल तयार करून ते इंदूर आणि इतर शहरांमध्ये विकले.
हेसुद्धा वाचा : Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्ला विराजमान; विलोभनीय मूर्तीचं पहिलं दर्शन भारावणारं
इथंच त्यांचा खरा प्रवास सुरु झाला. 2006-07 मध्ये पेप्सिको इंडियाच्या कुरकुरेला टक्कर देण्यासाठी त्यांनी येलो डायमंडचं चुलबुले बाजारात आणलं. काळ पुढं गेला गुंतवणुकीतले बारकावे जाणत कुमत यांच्या आणि त्यांच्या पार्टनरच्या वतीनं गुंतवणूक करण्यास आली आणि कंपनीनं नवी यंत्र खरेदी करत नवी उत्पादनं बाजारात आणली.
अखेर तो क्षण आलाच...
कुमत यांची कंपनी यशाची शिखरं चढतच होती. पुढे अभिनेता सलमान खान या कंपनीसाठी ब्रँड अँम्बेसिडर म्हणून जाहिरात करू लागला. BSE मध्ये प्रताप स्नॅक्सचा 938 रुपयांचा शेअर 1270 रुपयांना लिस्ट झाला आणि चहूबाजूंनी फायदाच फायदा झाला. सध्याच्या घडीला 14 राज्यांमध्ये या कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट असून आजच्या दिवसाला त्यांचा मार्केट कॅप आहे 3,272.22 कोटी रुपये.