नवी दिल्ली : देशात पेट्रोल - डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकडे हळुहळु ग्राहकांचा कल वाढत आहे. परंतु इलेक्ट्रिक वाहनांसाठी गरजेचे असणारे चार्जिंग स्टेशन्स अद्याप पुरेसे उपलब्ध नाही. त्यासाठी सरकारनेही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत.  इलेक्ट्रिक वाहने जसजशी वाढत जातील तसतसे चार्जिंग स्टेशन्सचीसुद्धा भारतात गरज निर्माण होणार आहे.  त्यामुळे EVRE कंपनीने 2023 पर्यंत 10 हजार इलेक्ट्रिक चार्जिग स्टेशन सुरू करण्याचे नियोजन केले आहे. तुम्ही हे चार्जिंग स्टेशन उभारून चांगली कमाई सुरू करू शकता. (Start electric vehicle ev charging station business)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगचे इंफ्रास्ट्रक्चर सुविधा उपलब्ध करणाऱ्या EVRE कंपनीने महत्वाचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या दोन वर्षात देशात 10 हजार चार्जिंग स्टेशन्स लावण्याचे नियोजन आहे. तसेच स्मार्ट पार्किंग सोल्यूशन ब्रांड पार्क प्लस (PARK +)सोबत करार केला आहे. 


EVRE ने म्हटले की, कंपनी कराराअंतर्गत ईवी चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर डिझाइन, कंस्ट्रक्सन, इंस्टॉलेशन, ऑपरेशन आणि मेंटनन्सची जबाबदारी सांभाळणार आहे. तसेच पार्क प्लस ही कंपनी रिअल इस्टेटच्या बाबींचे नियोजन आणि मेंटनन्स सांभाळणार आहे.


चार्जिंग स्टेशन उघडण्याची ट्रेनिंग
सरकारने देशात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करण्याबाबत नवीन योजना आणल्या आहेत.मिनिस्ट्री ऑफ मायक्रो ऍंड मीडियम एंटरप्राइजेस (MSME)या योजनांना पुढे आणून युवकांना ट्रेनिंग देत आहे. या योजनाअंतर्गत युवकांना चार्जिग स्टेशन बाबत सविस्तर माहिती आणि बिझनेस ट्रेनिंग दिली जात आहे.
इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन ट्रेनिंग मध्ये तुम्हाला मॅकॅनिजम, सोलर पावर्ड इलेक्ट्रिक व्हेहिकल चार्जिंग स्टेशन टेक्नॉलॉजी, इंफ्रास्ट्रक्चर, बिझनेस, सोलर पीवी चार्जिंग कनेक्टिविटी लोड्स, इलेक्ट्रिसिटी टॅरिफ सारख्या अनेक गोष्टींबाबत सविस्तर माहिती दिली जाते. (how to start small business) या ट्रेनिंगमध्ये या बिझनेसबाबत संपूर्ण माहिती दिली जाते. यानंतर तुम्ही चार्जिंग स्टेशन्स सुरू करून चांगली कमाई करू शकता.(Business idea)


निती आयोगाच्या नियोजनानुसार, देशात या दशकाच्या शेवटापर्यंत कमर्शिअल कारांमध्ये 70 टक्के, खासगी कारांमध्ये 30 टक्के, बसेसमध्ये 40 टक्के तर दुचाकी आणि तिनचाकी वाहने इलेक्ट्रिक व्हेहिकल होणे आवश्यक आहे.


चार्जिंग स्टेशन कसे सुरू कराल?
EVRE सारख्या अनेक कंपन्या येणाऱ्या दिवसांमध्ये ईवी चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी फ्रेंचाइजी देतील. या कंपन्यांकडून फ्रेंचाइजी घेऊन तुम्ही चार्जिंग स्टेशन सुरू करू शकतात. इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन लावण्यासाठी साधारण 4 लाख रुपयांपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे.