सौरभ पांडे, झी मीडिया, मुंबई : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांनी लक्ष द्या. बाजार नियामक सेक्योरिटीज ऍंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)ने T+1 (ट्रेड+1 दिवस)सेटलमेंट सायकल लागू करण्याची तारीख पुढे ढकलली आहे. ही सेटलमेंट सायकल आता 25 फेब्रुवारी 2022 पासून लागू होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्केट रेग्युलेटर सेबीने शेअर खरेदी-विक्रीचा व्यवहार सेटल करण्याबाबत T+1 (ट्रेड आणि पुढील दिवस)ही नवीन व्यवस्था सादर केली होती. याचा उद्देश बाजारातील व्यवहार वाढवणे हा होता. सध्या भारतीय बाजारांमध्ये व्यवहाराच्या दिवसानंतर 2 दिवसांनी सेटलमेंट होते. (T+2)


1 जानेवारी पासून लागू होणार होता नियम
सेबीकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार शेअर खरेदी विक्री प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी T+1 किंवा T+2 असा पर्याय देऊन शेअर बाजारातील व्यवहारांमध्ये लवचिकता आणली जाणार आहे. हा सेटलमेंट प्लॅन ट्रेडर्ससाठी पर्यायी असणार आहे. म्हणजेच ट्रेडर्सची इच्छा असेल तर ते हा पर्याय निवडू शकतो. हा नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार होता.


सेटलमेंट सायकल कमी करण्याची मागणी
मार्केट रेग्युलेटर सेबीकडे असे अनेक निवेदन येत होते ज्यामध्ये सेटलमेंट सायकल कमी करण्याची मागणी होत होती. सेबीने या निवेदनांना गांभीर्याने घेत नवीन नियम तयार केले आहेत. 


सेबीने  एक सर्कुलर जारी करून म्हटले की, मार्केट इंफ्रास्ट्रक्चर इंस्टिट्युशन स्टॉक एक्सचेंज, क्लिअरिंग कॉर्पोरेशन आणि डिपॉजिटरी सोबत चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला होता की, स्टॉक एक्सचेंजकडे ही सुविधा असणार होती की, ते T+1 किंवा T+2 सेटलमेंट सायकलमध्ये कोणतीही ऑफर करतील.


1 महिन्याआधी नोटिस द्यावी 
सेबीच्या सर्कुलरनुसार, कोणताही स्टॉक एक्सचेंज सर्व शेअर धारकांसाठी कोणत्याही शेअरसाठी T+1 सेटलमेंट सायकल निवडू शकतो. सध्या सेटलमेंट सायकल बदलण्यासाठी कमीत कमी एक महिना आधी नोटिस द्यावी लागेल. 


स्टॉक एक्सचेंज कोणत्याही शेअरसाठी एकदा T+1 ची निवड करीत असेल, तर त्याला कमीत कमी 6 महिन्यांपर्यंत जारी ठेवणे गरजेचे असेल. जर स्टॉक एक्सचेंजमध्ये T+2 सेटलमेंट सायकल पर्यायाची निवड करायची असेल तर त्याला 1 महिना आधी नोटीस देणे गरजेचे असेल. शेअर बाजाराला आपल्या वेबसाईटवरून यासंबधी सविस्तर माहितीचा प्रसार करणे आवश्यक असणार आहे.