आयएस अधिकाऱ्याने आत्महत्येपूर्वी बनविला हा व्हिडिओ होतोय व्हायरल
जिल्हाधिकारी मुकेश पांडेय यांनी गुरुवारी सायंकाळी गाझियाबाद येथे आत्महत्या केल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ माजली होती. मुकेश पांडेय यांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याचे वृत्त होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठीही लिहीली होती. पण आता यासंबधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी हॉटेलमध्ये रेकॉर्ड केला होता.
पटना : जिल्हाधिकारी मुकेश पांडेय यांनी गुरुवारी सायंकाळी गाझियाबाद येथे आत्महत्या केल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ माजली होती. मुकेश पांडेय यांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याचे वृत्त होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठीही लिहीली होती. पण आता यासंबधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी हॉटेलमध्ये रेकॉर्ड केला होता.
या व्हिडिओनुसार त्यांनी आत्महत्या करण्याचं प्लानिंग बक्सरच्या सर्किट हाऊसमध्ये केलं होतं. आई, वडील आणि पत्नी यांच्यातील भांडणाला मी वैतागलो आहे. आई, वडील आणि पत्नी यापैकी कोणीही चुकीचे नाहीत, सगळे माझ्यावर प्रेम करतात. माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही, असंही त्यांनी व्हिडिओत म्हटलं आहे. मात्र त्यांनी हा व्हिडिओ कधी शूट केला हे स्पष्ट झालं नाही. पण या व्हिडिओमुळ त्यांच्या आत्महत्या प्रकरणी महत्त्वाचा सुगावा पोलिसांना मिळाला आहे.
मुकेश पांडेय यांनी मेसेजमध्ये लिहिलं होतं की, मी दिल्लीतील जनकपुरी येथील डिस्ट्रिक्ट सेंट्रल मॉलच्या दहाव्या मजल्यावरुन आत्महत्या करण्यास जात आहे. माझी सुसाईड नोट दिल्लीच्या लीला पॅलेस हॉटेलमधील रुम नंबर ७४२ मधील माझ्या रुममध्ये ठेवली आहे. मला माफ करा मी तुमच्या सर्वांवर खुप प्रेम करतो. आत्महत्या करण्यापासून रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले मात्र ते सगळे अयशस्वी ठरले आहेत. ४ ऑगस्टला सुट्टी घेऊन ते दिल्लीतील चाणक्यपुरीच्या लीला हॉटेलमध्ये थांबले होते. त्यानंतर जवळपास १० तासांनंतर त्यांचा मृतदेह गाझियाबादमधील रेल्वेरुळावर सापडला होता. मुकेश यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या काही मित्रांना आणि कुटुंबियांना मेसेज केले होते. त्यांना वाचविण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला होता पण ते सर्व निष्फळ ठरले.