दिवाळीला केवळ एका रुपयात खरेदी करा सोनं... ही `फेक न्यूज` नाही!

ग्राहक आपल्या इच्छेनुसार कोणत्याही किंमतीचं सोनं खरेदी करू शकतील
मुंबई : सोनं खरेदी करण्यासाठी तुमच्या खिशात काही हजार रुपये असणं गरजेचं असणं आवश्यक मानलं जात होतं... सोनं म्हणजे श्रीमंती, अशीच सोन्याची ओळख... परंतु, मात्र परिस्थिती बदललीय. आता तुमच्या बँक अकाऊंटमध्ये एक रुपयाही असला तरी तुम्हाला सोनं खरेदी करता येणार आहे... आणि हो ही फेक न्यूज नाही...
डिजिटल फायनान्शिअल सर्व्हिस प्लॅटफॉर्म 'मोबिक्विक'नं आपल्या अॅपवर डिजिटल गोल्ड लॉन्चची घोषणा केलीय. डिजिटल गोल्ड लॉन्चिंगसोबतच ग्राहकांना २४ कॅरेट सोनं खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
आमची सहकारी वेबसाईट Zeebiz.com/hindi नं दिलेल्या माहितीनुसार, डिजिटल गोल्डमध्ये तुम्ही अवघ्या एका रुपयातही सोनं खरेदी करू शकाल... दिवाळीपूर्वी यामध्ये आणखी काही नवे फिचर्स जोडले जातील.
यासाठी, 'मोबिक्विक'नं यासाठी 'सेफ गोल्ड'शी हातमिळवणी केलीय. मोबिक्विक अॅप वापरणारे ग्राहक आपल्या इच्छेनुसार, कोणत्याही किंमतीचं सोनं खरेदी करू शकतील.
एकदा सोनं खरेदी केल्यानंतर २४ तासांनी ते तुम्ही विकूही शकता. यासाठी ग्राहकांना अॅपशी लिंक असलेलं बँक अकाऊंट किंवा मोबिक्विक वॉलेटमध्ये पैसे प्राप्त करण्याचा पर्याय उपलब्ध असेल.