मुंबईः जर तुमच्या पांढऱ्या कपड्यांवर हळदीचे डाग पडले असतील तर काळजी करण्याची काहीच गरज नाही, सोप्या घरगुती उपायांनी यापासून मुक्ती मिळवता येते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हलक्या रंगाच्या कपड्यांमधून हट्टी डाग घालवणं इतकं सोपं नाही, म्हणूनच बरेच लोक गडद रंगाचे पोशाख घालण्यास प्राधान्य देतात. उन्हाळ्यात पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून तीव्र सूर्यप्रकाशाचा परिणाम शरीरावर जास्त होऊ नये, परंतु खाताना किंवा स्वयंपाक करताना कपड्यांवर अनेकदा हळदीचे डाग दिसतात, ज्यापासून सुटका होणे कठीण असते. हेच डाग घालवण्यासाठी खालील घरगुती उपाय करू शकता.


1. लिंबू:
अनेक वेळा आपण घराबाहेर जेवण करतो अशा वेळी जेवणाचे डाग कपड्यांवर पडल्यास त्यावेळी डिटर्जंट पावडर मिळणं अवघड होतं. अशा परिस्थितीत, आपण डाग लागलेल्या भागात लिंबू चोळू शकता किंवा त्याचे थेंब डागांवर टाकू शकता आणि नंतर ते नंतर पाण्याने स्वच्छ करू शकता.


2.थंड पाणी:
पांढऱ्या कपड्यांवर हळदीचे डाग पडल्यास सर्वप्रथम थंड पाण्यात बुडवून डिटर्जंटमध्ये काही वेळ धुवा. थंड पाण्याच्या प्रभावामुळे कठीण डागही हलके होतात. बर्‍याच लोकांना असं वाटतं की गरम पाण्याचा डागांवर चांगला परिणाम होतो, परंतु खरं अगदी उलट आहे.


3. टूथपेस्ट
टूथपेस्टचा वापर दात स्वच्छ करण्यासाठी केला जातो, परंतु टूथपेस्टचा वापर कठीण डाग दूर करण्यासाठीही होतो हे खूप कमी लोकांना माहिती असेल. डाग असलेल्या भागावर टूथपेस्ट घासून घ्या आणि नंतर थोडा वेळ कोरडे राहू द्या, शेवटी स्वच्छ पाण्याने धुवा.


4. व्हिनेगर
व्हिनेगरचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो, पण त्याचा वापर कपडे स्वच्छ करण्यासाठीही करता येतो. लिक्विड साबणामध्ये व्हिनेगर मिसळा आणि हळदीचा डाग असलेल्या ठिकाणी लावा, सुमारे अर्धा तास कोरडे होऊ द्या नंतर ते धुवा.