Byju Crisis : एडटेक कंपनी बायजूच्या अडचणीत वाढ झाल्याच पाहिला मिळत आहे. अलीकडेच बीसीसीआयची 158 कोटी रुपयांची थकबाकी भरण्याचं आश्वासन दिल्यानंतरही या कंपनीपुढे आता नवी संकट कोसळलंय. बायजूचे निलंबित संचालक रिजू रवींद्रन यांना दररोज 10,000 डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार सुमारे 8.38 लाख रुपये भरण्याचे आदेश देण्यात आलेय. जोपर्यंत रिजू हे 533 दशलक्ष डॉलर्सची योग्य माहिती देत नाही तोपर्यंत त्यांना ही रक्कम भरायची आहे. (Byju Ex director riju ravindran trouble increases fine of 8 lakhs to be paid daily)


काय आहे नेमकं प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बायजूचे संस्थापक बायजू रवींद्रन यांचं भाऊ रिजू रवींद्रन हे संकटात सापडले आहेत. त्यांच्यावर असा आरोप आहे की, त्यांच्या कंपनीने 533 दशलक्ष डॉलर्सची संबंधित माहिती अमेरिकन कर्जदारांपासून लपवली आहे. रिजू रवींद्रन हे गेल्या दोन वर्षांपासून पैशांबाबत योग्य माहिती न दिल्यामुळे सुरू असलेल्या वादामुळे चर्चेत आहेत. पैसे चुकवल्यानंतर हे पैसे कंपनी उधारदातांना परत केलं जावंत, असं त्यांचं म्हणणंय. रिजू रवींद्रन हे बायजूचा ब्रँड चालवणाऱ्या थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेडच्या तीन संचालकांपैकी एक आहेत. 


यूएस न्यायाधीश ब्रेंडन शॅनन यांनी एक याचिका फेटाळलीय. या याचिकेत रिजू रवींद्रन आणि कंपनीला नवीन वकील शोधण्याची परवानगी देण्यासाठी अमेरिकेत सुरू असलेले कर्ज प्रकरण थांबवण्याची मागणी केली होती. रिजू रवींद्रन आणि बायजू युनिटचे अमेरिकन वकील दिवाळखोरी प्रकरणात त्यांच्या क्लायंटचा बचाव सोडू इच्छितात. न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयात असं म्हटलंय की, रिजू रवींद्रन यांच्या वकिलांना किमान पुढील महिनाभर त्यांच्या अशिलाचे प्रतिनिधीत्व करावे लागणार आहे. 


2022 मध्ये यूएस सावकारांकडून $1.2 अब्ज कर्ज घेण्याच्या 18 महिन्यांत बायजूने मुख्य आर्थिक अहवालाची अंतिम मुदत चुकवल्यामुळे हे सर्व घडलंय असं समोर आलंय. भारतातील नियामकाने कार्यालयावर छापा टाकला आणि अमेरिकन सावकारांनी डिफॉल्ट केल्याचा आरोप केलाय. यानंतर, कंपनीवर अमेरिकेत स्थापन झालेल्या एका रिक्त कंपनीतून $533 दशलक्ष डॉलर्सची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. बायजूने आपल्या कृतीचा बचाव केलाय.