मुंबई : वयात आलेल्या प्रत्येक मुलीला तिचे मासिक पाळीचे दिवस हे थोडे कठीण असतात. शरीरात आणि हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलातून महिला या दिवसांत जात असतात. अशावेळी त्यांना कामाच्या ठिकाणी अधिक आरामदायी भावना मिळावी म्हणून एज्युकेशन कंपनी बायजूस (Byju's)ने महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी, कंपनीने सांगितले की त्यांनी आपल्या महिला कर्मचार्‍यांसाठी रजा धोरण बदलले आहे. जेणेकरून कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी लवचिक पद्धतीने काम करू शकतील. यामध्ये 'पीरियड लीव्हज' आणि चाइल्ड केअर लीव्हचा समावेश आहे.


आता मिळणार 12 दिवसांची Periods Leave 


कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, हे नवीन धोरण कर्मचार्‍यांना आनंद, कामाच्या जीवनातील सुसंवाद, लवचिकतेकरता बदलण्यात आले आहे. कामाच्या ठिकाणी संवेदनशीलतेला प्राधान्य देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. बायजूच्या नवीन बाल संगोपन रजेनुसार, 12 वर्षांपर्यंतच्या मुलांसह कर्मचारी वार्षिक सात सुट्या घेऊ शकतात. या सुट्ट्या अनेक वेळा घेता येतात आणि या अंतर्गत अर्ध्या दिवसाची रजा देखील घेता येते.


निष्पक्ष आणि संतुलित कार्य संस्कृती निर्माण करण्यासाठी, बायजूच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांना एका कॅलेंडर वर्षात एकूण 12 दिवसांची 'Periods Leave' मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे. बायजूमध्ये सुमारे 12,000 कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी काम करतात.


मॅटर्निटी लीवमध्ये होणार फायदा 


नवीन मॅटर्निटी लीव्ह पॉलिसी अंतर्गत, 26 आठवड्यांच्या सशुल्क रजेव्यतिरिक्त, कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना 13 आठवड्यांची अतिरिक्त सशुल्क रजा देखील देईल. अशाप्रकारे, वडील झाल्यावर मिळणाऱ्या पितृत्व रजेची संख्या सात वरून १५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे.


गेल्या वर्षी फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोनेही असाच निर्णय घेतला होता. ऑगस्ट 2020 मध्ये कंपनीने आपल्या महिला कर्मचाऱ्यांना वर्षातून 10 दिवसांची सुट्टी देण्याची घोषणा केली होती. आजही देशात पीरियड्स हा एक मूक विषय आहे. ज्यावर लोक उघडपणे बोलू इच्छित नाहीत.


स्वच्छता आणि जागरुकता नसल्यामुळे अनेक वेळा महिलांना मासिक पाळीदरम्यान अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ग्रामीण भागात परिस्थिती वाईट आहे, जिथे सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर आणि वापर अजूनही सामान्य नाही