CA Exam 2021 : 'इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया' (ICAI) च्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धीरज खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीएआयने आज सीए इंटरमिजिएट आणि अंतिम परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. संस्थेच्या नोटीसनुसार, "सध्या कोविड साथीच्या संसर्गामुळे विद्यार्थ्यांचे वेलफेअर आणि त्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी 21 मेपासून सुरु होणारी सीए फायन आणि 22 मे रोजी सुरू होणारी सीए इंटरमिजिएट परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत."


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थगित सीए इंटर व अंतिम परीक्षांसाठी नवीन तारखांच्या घोषणेसंदर्भात आयसीएआय म्हणाले की कोविड प्रकरणं, केंद्रीय गृह मंत्रालयाचे निर्देश, केंद्र व राज्य सरकारच्या निर्देश इत्यादींचा आढावा घेतल्यानंतर नवीन परीक्षेच्या तारखांची घोषणा केली जाईल. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या नव्याने ठरलेल्या तारखेच्या किमान 25 दिवस आधी अधिसूचना जारी केली जाईल. यासह, आयसीएआयने विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात वेळोवेळी अधिकृत वेबसाइट icai.org भेट देण्याचे आवाहन केले आहे.


'इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंट्स ऑफ इंडिया' देशभरात सीए परीक्षा घेत असते. 


आयसीएआयच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धीरज खंडेलवाल यांनी गुरुवारी, 22 एप्रिल 2021 रोजी ट्विट केले की, "मला परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत बरेच प्रश्न विचारले जात आहेत." आयसीएआय आणि परीक्षा समिती सध्याच्या साथीच्या परिस्थितीबद्दल माहिती घेऊन या महिन्याच्या अखेरीस योग्य तो निर्णय घेतील. या दरम्यान, अभ्यासासाठी कठोर परिश्रम करा."


4 मे पर्यंत सीए फाउंडेशन जून 2021 परीक्षांची नोंदणी


सीए फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी की, जूनमध्ये 24, 26, 28 आणि 30 तारखेला प्राथमिक फाऊंडेशन कोर्स परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया चालू आहे आणि त्यासाठी अंतिम तारीख 4 मे आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप सीए फाउंडेशन परीक्षा 2021 साठी नोंदणी केलेली नाही ते आपला परीक्षा फॉर्म संस्थेच्या अधिकृत वेबसाइट, icaiexam.icai.org या संकेतस्थळावर ऑनलाईन भरू शकतात.