नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी विरोधात दिल्लीमध्ये निदर्शनं सुरू आहेत. जामा मशिद ते जंतरमंतर अशी रॅली काढण्यात आली आहे. भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर या रॅलीत सहभागी आहेत. सतर्कतेचा ईशारा म्हणून ईशान्य दिल्लीतील १४ पैकी १२ पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या भागात कलम १४४ लागू करण्यात आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हर्ष विहार आणि सोनिया विहार या भागात कलम १४४ लागू नाही. याठिकाणी दिल्ली पोलिसांच्या १० तुकड्या तैनात करण्यात आल्यात. अफवा पसरविल्यामुळं आतापर्यंत १० जाणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.


दिल्लीतल्या जामिया, चांदनी चौक, सीमलपूर भागात पोलिसांची विशेष नजर असणार आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून देशातल्या अनेक भागातली मोबाईल आणि इंटरनेट सेवा खंडित केली जाण्याची शक्यता आहे.


या रॅलींध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांनी देखील सहभाग घेतला आहे. शिवाय लाल किल्ल्या जवळचा परिसर बंद करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ड्रोनच्या माध्यमातून रॅलीवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. 


सतर्कता म्हणून दिल्लीतील काही परिसरात इन्टरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे. रॅलीमध्ये तरूणांचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. पण कोणाच्या आदेशाने रॅली काढण्यात आली हे अद्याप अस्पष्ट आहे.