नवी दिल्ली : आर्थिक संकटातून जाणाऱ्या बीएसएनएल आणि एमटीएनएलचा कायापालट करण्यास कॅबिनेटने मंजूरी दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार या दोन्ही कंपन्यांना मिळून साधारण १४ हजार कोटी रुपये देणार आहे. यातील १० हजार कोटी रुपये बीएसएनएल आणि ४ हजार कोटी रुपये एमटीएनएलला दिले जाणार आहेत. कर्मचाऱ्यांना व्हीआरएस जेण्यासाठी हा फंड वापरला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांना आकर्षक व्हीआरएस प्लान देण्यावर केंद्र सरकार काम करत असल्याची माहिती याआधी सुत्रांनी दिली होती. व्हीआरएस कोणत्या आधारावर देणार हे सध्या स्पष्ट नाही आहे. सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएल आणि एमटीएनएल सातत्याने आर्थिक डबघाईत सापडत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही कंपन्यां आपल्या कर्मचाऱ्यांना वेतन देणेही शक्य होत नाही आहे.