मुंबई : ऑप्टिकल इल्युजन आणि अनेक चित्रांचे फोटो दाखवत आम्ही तुमच्यातली बुद्घिमत्ता तपासत असतो.  आता आणखीण एक फोटो घेऊन आलाय. या फोटोतली चुक तुम्हाला ओळखायची. 99 टक्के नागरीकांना या फोटोतली चुक शोधता आली नाही आहे. तुम्हाला शोधता येतेये का पाहा.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रात काय?  
तुमच्या समोर वाळवंटाचे चित्र आहे. जर तुम्ही चित्र नीट बघितले तर तुम्हाला असे दिसून येईल की या चित्रात दोन उंट आहेत आणि भरपूर सूर्यप्रकाश आहे. हे चित्र प्रथमदर्शनी पाहिल्यास तुम्हाला कोणतीही चूक दिसणार नाही. पण जर तुम्ही डोक्यावर ताण दिलात, तर या चित्रात दडलेली चूक तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. या चित्रात लपलेली चूक शोधण्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंद आहेत. म्हणून डोक चालवा आणि चित्रात लपलेली चूक शोधा.


या चित्रातली चूक तुमच्या डोळ्यासमोरच आहे. तुम्ही ही चुक शोधायला यशस्वी ठरलात? जर होय, तर तुम्ही स्वतःला एक प्रतिभावान म्हणू शकता आणि जर नाही, तर काही हरकत नाही, आम्ही तुम्हाला मदत करतो. वास्तविक, उंट दुपारी उष्ण वाळवंटावर चालत असल्याचे चित्रात स्पष्ट होते. पण तरीही दोन्ही उंटांची सावली वाळवंटावर पडत नाही.