नवी दिल्ली: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.व्हिडिओ एका अपघाताचा आहे. अपघात इतका भीषण की, व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे तर, येतातच पण हृदयाचा थरकापही होतो. आश्चर्य, भय, वेदना आणि व्याकूळता या सर्व भावाना व्हिडिओ पाहताना मनात पहिल्या क्षणातच निर्माण होतात. 


उंट कारमध्ये घुसला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रासरमाध्यमांतून आलेल्या वृत्तानुसार, एका भरधाव वेगात असलेल्या कारने एका उंटाला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारचे दरवाजे तुटून उंट कारमध्ये घुसला आणि अडकला. घटनास्थळावर कारमध्ये अडकेल्या उंट पाहण्यास लोकांनी गर्दी केली. रक्तमाखला उंट वेदनेने ओरडत होता आणि लोक हे चित्र आश्चर्याने पाहात होते. काही वेळांने गर्दी वाढली आणि गर्दीतीलच काही लोक पुढे आले आणि त्यांनी उंटाला कारमधून बाहेर काढले. गंभीर जखमी झालेला हा उंट पुढे वाचला की नाही याबाबत माहिती उपलब्ध नाही.



सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना  काळजी घ्या


दरम्यान, ही घटना पश्चिम अशीयातील जॉर्डन येथे घडल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांनी दिली आहे. पण, सोशल मीडियावर हा व्हडिओ चुकीचे घटनास्थळ सांगूत शेअर केला जात आहे. काही लोक हा व्हिडिओ राजस्थानमधील असल्याचे सांगत सोशल मीडियावर शेअर करत आहेत. सोशल मीडियावर एखादी पोस्ट शेअर करताना प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. अफवा पसरवल्याने मोठ्या दुर्घटना घडू शकतात. घडल्या आहेत.