नवी दिल्ली : भाषणाच्यावेळी उठून चाललेल्या व्यक्तीला भाजपचे केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांनी भरकार्यक्रमात पाय तोडण्याची धमकी दिली. ते म्हणाले, 'काय प्रॉब्लेम आहे तुमचा? तुमचा पाय तोडून तुम्हाला एक व्हीलचेअर गिफ्ट देईन.' 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांचे भाषण सुरु असताना एक दिव्यांग व्यक्ती व्यासपीठासमोर वारंवार येत होती. त्यामुळे संतापलेल्या मंत्रिमहोदयांनी या दिव्यांग व्यक्तीला थेट पाय तोडण्याची धमकीच दिली. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 



आसनसोल येथे दिव्यांगांसाठी एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात दिव्यांगांना व्हीलचेअर आणि अन्य आवश्यक साहित्यांचे वितरण केले जाणार होते. या कार्यक्रमात सुप्रियो यांचे भाषण सुरु झाल्यानंतर उपस्थितांपैकी खाली लोकांमध्ये बसलेली एक दिव्यांग व्यक्ती वारंवार मंचासमोरुन जात होती. तेव्हा सुप्रियो यांनी त्या व्यक्तीला ''तुम्ही का हालचाल करत आहात ? कृपया खाली बसा'', असे सांगितले होते. मात्र, त्या व्यक्तीची हालचाल थांबत नव्हती. अखेर संतापलेल्या सुप्रियो यांचा पारा चांगलाच चढला. या संतापाच्या भरात सुप्रियो यांनी ''तुला काही अडचण आहे का ? तुला काय झाले ? मी तुझे पाय तोडेन आणि तुला व्हीलचेअर देईन'', अशी थेट धमकीच त्या दिव्यांग व्यक्तीला दिली.