नवी दिल्ली: कोरोना व्हायरसवर (Coronavirus) गंगाजल वापरुन उपचार करता येईल का, याबाबत संशोधन करण्याची मोदी सरकारची मागणी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (ICMR) नाकारली आहे. काही दिवसांपूर्वीच जलशक्ती मंत्रालयाकडून हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, सध्याच्या घडीला कोरोनाचा वेगाने होणारा प्रादुर्भाव पाहता ICMRला इतर गोष्टींमध्ये वेळ फुकट घालवायचा नसल्याचे सूत्रांनी सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीपीई किट, एन-९५ मास्कवरील कोरोना नष्ट होणं शक्य, विद्यापीठात संशोधन
 
जलशक्ती मंत्रालयाने अतुल्य गंगा या एनजीओचा हवाला देत ICMRकडे गंगाजलावर संशोधन करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात जलशक्ती मंत्रालयाने पाठवलेल्या पत्रात म्हटले होते की, गंगेच्या पाण्यात bacteriophage हा ninja virus आहे. bacteriophage हा इतर धोकादायक विषाणुंना मारुन टाकतो. यामुळे कोरोना बरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गंगेच्या पाण्याचे संशोधन करता येईल का, असे जलशक्ती मंत्रालयाकडून विचारण्यात आले होते. 


'भविष्यात कोरोनासोबत या आजारांचा धोका', टास्क फोर्स प्रमुख डॉ.संजय ओक यांचा इशारा


हे पत्र मिळाल्यानंतर ICMR च्या तज्ज्ञांची एक बैठकही झाली. त्यावेळी आम्ही प्रस्ताव मांडणाऱ्या संस्थेला देशातील किती रुग्णालये आणि डॉक्टर्स यावर संशोधन करायला तयार आहेत, याबाबत विचारणा केली. सध्या आपण कोरोनावरील उपचारासाठी केवळ प्लाझ्मा थेरपीचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करत आहोत. त्यामुळे आपण इतक्या पटकन गंगेच्या पाण्यातील bacteriophage हा ninja virus COVID-19 विषाणुला मारून टाकेल, यावर विश्वास कसा ठेवू शकतो. त्यामुळे सध्यातरी या दाव्यात तथ्य दिसत नाही, असे ICMR चे म्हणणे आहे. मात्र, जलशक्ती मंत्रालयाने यासाठी पुढाकार घेतल्यास आम्ही त्यांना जरुर सहकार्य करु, असेही ICMR ने म्हटले आहे.