कधी झाडांना झोपताना पाहिलं आहे? हा व्हिडीओ पाहा, तुम्हाला डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही
आपल्यापैकी जवळ-जवळ प्रत्येकाच्या मनात, लहानपणापासून एक प्रश्न असतो की, झाडं हे सजीव आहेत. मग ते माणसासारखी हालचाल का करत नाहीत? किंवा झाडं कधी झोपत असतील का?
मुंबई : सोशल मीडियावर एखादा व्यक्तीने एन्ट्री केली की, संपलंच सगळं. कारण इथे एकद्या आल्यानंतर लोकांचा कसा तासनतास वेळ निघून जातो, हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. कारण इथे इतके कन्टेन्ट आढळतात, जे आपल्याला कधीही कंटाळा येऊ देत नाही. इथे लोकांच्या आवडीच्या सगळ्याच प्रकारचे कन्टेट आढळतात. मग तो व्हिडीओ प्रवासाचा असो, डान्स गाण्याचा किंवा एखाद्या कॉमेडीचा. आपल्या वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. एवढंच काय तर प्राणी, पक्षी, झाडं यासंबंधीत देखील वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
जर तुम्हालाही निसर्गावर प्रेम असेल किंवा तुम्हाला वनस्पतींची काळजी घ्यायला आवडत असेल तर हा व्हिडीओ तुमच्यासाठीच आहे असं समजा. या व्हिडीओमध्ये तुम्ही झाडांची दिनचर्या पाहू शकता.
आपल्यापैकी जवळ-जवळ प्रत्येकाच्या मनात, लहानपणापासून एक प्रश्न असतो की, झाडं हे सजीव आहेत. मग ते माणसासारखी हालचाल का करत नाहीत? किंवा झाडं कधी झोपत असतील का? तर आम्ही तुमच्यासाठी एक व्हिडीओ आणला आहे. जो पाहून तुम्ही थक्कंच व्हाल आणि तुमचा तुमच्या डोळ्यांवरती विश्वासच बसणार नाही.
बरेच लोक झाडे आणि रोपांची काळजी घेतात जसे की त्यांच्या घरातील झाडे त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांना योग्य वेळी पाणी देणे, योग्य वेळी सूर्यप्रकाश दाखवणे आणि माती बदलणे हे झाडांचे आरोग्य राखण्यासाठी आवश्यक आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की झाडे उठतात आणि झोपतात? सर्वप्रथम तुम्ही हा व्हायरल व्हिडिओ पाहावा.
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आपल्या माणसांप्रमाणेच झाडेही झोपतात आणि जागे होतात. अवघ्या 23 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला झाडे झोपताना आणि नंतर उठताना दिसत आहेत. हा व्हिडीओ फास्ट फॉरवर्डमध्ये शुट केलेला असावा, जो 3 ते 4 दिवस शुट केला गेला असावा.
सर्वसाधारण आपण जेव्हा झाडांना पाहातो, तेव्हा ते नॉर्मलच दिसतात, परंतु जेव्हा आपण असं फास्टफॉरवर्डमध्ये पाहातो, तेव्हाच आपल्याला हे सगळं स्पष्टपणे दिसू लागतं.
हा व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत तो 1.5 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.