Can You Solve This Viral Math Puzzle: निवडणुकांची आकडेवारी, आघाडी, पराभव, विजय, पराजय याचीच चर्चा देशामध्ये मागील 2 दिवसांपासून आहे. आज मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण आणि छत्तीसगडमधील विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल असल्याने देशात या निकालांचीच चर्चा आहे. पण राजकीय बातम्या आणि त्याच त्याच रुटीनमधून तुम्हाला कंटाळा आला असेल आणि जरा वेगळ्या गोष्टीमध्ये मन रुळतंय का पाहण्याची इच्छा असेल तर काय करता येईल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आमच्याकडे एक उपाय आहे. तुम्हाला डोकं खाजवायला लावणारं एक भन्नाट कोडं आमच्याकडे आहे. हे खरं तर एक ब्रेन टिझर आहे. हे साधं सरळ गणित असलं तरी अनेकांना त्याचं उत्तर देताना नाकीनऊ येतात.


नक्की प्रश्न काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इन्स्टाग्रामवरील प्राइम मॅथ्स क्विझ या हॅण्डलवरुन हे गणित शेअर करण्यात आलं आहे. या पेजवर खरं तर गणितासंदर्भातील अनेक मजेदार प्रश्न अगदी रंजक पद्धतीने शेअर केले जातात. ही गणितं दिसायला फारच सोपी असली तरी त्यांचं उत्तर शोधताना आपल्याला खरोखरच गणित येतं की नाही असा प्रश्न उत्तर शोधणाऱ्याला पडल्याशिवाय राहत नाही. सध्या चर्चेत अशलेल्या प्रश्नामध्ये 14 ÷ 7 (3- 3) हा प्रश्न विचारण्यात आला आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ठाऊक आहे का? केवळ हुशार लोकांनाच या प्रश्नाचं उत्तर येईल असं म्हटलं आहे. 


देण्यात आलेत हे 2 पर्याय


या प्रश्नाला 2 आणि 0 असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. आठवड्याभराहून अधिक काळापासून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न नेटकरी करत आहेत. काहींनी पहिला पर्याय म्हणजे 2 उत्तर बरोबर असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी शून्य हे उत्तर बरोबर असल्याचं म्हटलं आहे. या पोस्टवर हजारोंच्या संख्येनं प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या आहेत. 99 टक्के लोकांना या प्रश्नाचं उत्तर येत नाही. तुम्हाला देता येईल का याचं अचूक उत्तर?



योग्य उत्तर काय?


गणिताच्या BODMAS नियमाप्रमाणे या गणिताचं उत्तर शोधताना विचार करावं लागेल. BODMAS नियमाप्रमाणे आधी ब्रॅकेट म्हणजेच कंसातील आकडेमोड पूर्ण करायची. त्यानंतर वर्ग सोडवायचे, मग भागाकार, मग गुणाकर आणि शेवटी बेरीज व वजाबाकी करावी. या नियामप्रमाणे गणित सोडवल्यास 
14 ÷ 7 (3 -3)
14 ÷ 7 (0)
14 ÷ 0
हे उत्तर येतं. म्हणजेच 0 ने 14 ला भाग जाणं शक्य नाही.


तसेच दुसऱ्या मार्गाने म्हणजे नियमांना बगल देत आधी 14 ÷ 7 चं उत्तर काढलं तर 2 असं येतं आणि या 2 ला 3-3 म्हणजेच शून्याने गुणल्यास उत्तर शून्य येतं.