मुंबई : अनेक ट्रिकी फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही फोटो त्यांच्या अचूक टायमिंगमुळे तर काही परफेक्ट अँगलमुळे व्हायरल होतात. त्यातील काही फोटो ऑप्टिकल इल्युजनचे असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे फोटो अशा पद्धतीने बनवले जातात की पाहणाऱ्याच्या मन सुन्न होते. सध्या सोशल मीडियावर असे काही फोटो खूप शेअर होत आहेत जे लोकांच्या डोळ्यांना भ्रमित करतात. ही चित्रे दहा सेकंदांपेक्षा जास्त कोणीही पाहू शकत नाही. याआधीच लोकांचे डोकं आणि डोळे दुखू लागले आहेत.अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर हे फोटो व्हायरल होत आहेत. एका चित्रात एक मोठा चेंडू दिसत आहे. हा चेंडू एका जागी ठेवला आहे. पण अनेकांना तो फोटो व्हिडीओ असल्याचं वाटतं. जेव्हा तुम्ही या चित्राकडे पाहाल तेव्हा हा चेंडू फिरत असल्याचं जाणवेल. हा फोटो ना व्हिडीओ आहे ना जीआयएफ, यानंतरही ते हलताना दिसत आहे. असे फोटो भ्रम निर्माण करतात.



दुसरे चित्र जांभळ्या रंगात काळ्या डागांचे आहे. या चित्राकडे पाहिल्यास असे वाटेल की, हे ठिपके एखाद्या मोठ्या काळ्या डागात आहेत. हे दोन्ही फोटो ऑप्टीकल इल्युजनचे प्रकार आहेत. म्हणजेच ही चित्रे आहेत पण ती अशा प्रकारे बनवण्यात आली आहेत की, ते व्हिडिओचा आभास निर्माण करतात आहेत.



तुम्ही या दोन चित्रांकडे एकटक पाहू शकता का? आम्हाला कमेंट करून सांगा..