`या` बॅंकेकडून Fixed Deposit च्या व्याजदरात मोठा बदल, जाणून घ्या नवीन दर
आताचं बॅंकेत एफडी उघडा, मिळतोय चांगला व्याजदर
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेनेही एफडीच्या व्याजदरात मोठा बदल केला आहे. त्यामुळे तुमचे ही या बॅंकेत खाते असले तर तुम्हाला एफडीवर चांगले व्याज मिळेल.त्यामुळे आताच एफडी उघडून घ्या.
बँका ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत FD ची सुविधा देतात. तुमच्या गरजेनुसार तुम्ही कितीही कालावधीसाठी FD मिळवू शकता.कॅनरा बँकेने २ कोटींपेक्षा कमी मुदतीच्या एफडीचे व्याजदर वाढले आहेत. बँकेचे नवीन व्याजदर 16 जुलै 2022 पासून लागू झाले आहेत.
बँकेने केलेल्या दुरुस्तीनंतर बँकेला ७ दिवसांपासून ४५ दिवसांपर्यंत २.९० टक्के दराने व्याजाचा लाभ मिळणार आहे. याशिवाय ४६ दिवस ते ९० दिवसांच्या एफडीवर ४ टक्के दराने व्याजाचा लाभ मिळेल. याशिवाय ९१ दिवस ते १७९ दिवसांच्या एफडीवर ४.०५ टक्के दराने व्याज मिळेल.
नवीन दर तपासा
बॅकेत 180 दिवस ते 269 दिवसांच्या एफडीवर 4.50 टक्के दराने व्याज मिळेल. 270 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 4.55 टक्के, 333 दिवसांच्या एफडीवर 5.10 टक्के, 1 वर्षाच्या एफडीवर 5.30 टक्के, 1 वर्षावरील आणि 2 वर्षांपेक्षा कमी एफडीवर 5.40 टक्के, 2 वर्षांवरील आणि 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.45 टक्के, 3 वर्षांवरील आणि 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.70 टक्के आणि 5 ते 10 वर्षांच्या FD वर 5.75 टक्के दराने व्याज मिळेल.