मुंबई : कर्करोग (कॅन्सरग्रस्त) पीडीत मुलांना शुक्रवारी जलेश क्रुझच्यामार्फत नवीन वर्षाची भेट मिळाली. जलेश क्रुझने कॅन्सरशी लढा देणाऱ्या या मुलांना आपल्या अलिशान आणि लक्झरी क्रुझचा अनुभव घेण्याची संधी दिली. या मुलांनी स्वप्नांमध्ये विचार केला नसेल की, त्यांना जगातील सर्वोत्कृष्ट क्रुझपैकी एक असलेल्या जलेश क्रुझवर फिरण्याची संधी मिळेल.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जलेश क्रुझ हा भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशनल क्रुझ आहे. क्रुझवर अशा अनेक सोयी-सुविधा आहेत हे क्रुझचे खास वैशिष्ट्य आहे. या क्रुझवर दोन जलतरण तलाव, करमणुकीसाठी नाट्यगृह, लाईव्ह वाद्यवृंद, आलिशान रुम आदी आहेत. क्रुझच्यावतीने मुलांना तांत्रिक माहिती देण्यात आली. क्रुझ पाण्यात कसे चालते हेही सांगितले गेले.


याशिवाय त्यांच्या मनोरंजनसाठी एक छोटी डान्स पार्टी देखील आयोजित करण्यात आली होती. मुले त्यांचे दुःख विसरुन नाचण्यात दंग झालेली पाहायला मिळालीत. त्यानंतर मुलांना खास भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.