भोपाळ: मध्य प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी घालण्यात आलेल्या अटी अखेर काँग्रेसने मागे घेतल्या आहेत. मध्य प्रदेश काँग्रेस समितीकडून यासंदर्भातील जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. यामध्ये फेसबुकवर 15 हजार लाईक असलेले पेज, ट्विटरवर 5 हजार फॉलोअर्स असतील तरच निवडणुकीचे तिकिट मिळेल, असे म्हटले होते. तसेच बूथ लेव्हलवरही कार्यकर्त्यांचा व्हाट्सअॅप ग्रुप हवा अशी अट घालण्यात आली होती. यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले होते. 


अखेर चर्चेअंती अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला. प्रदेश उपाध्यक्ष चंद्रप्रभाष शेखर यांनी 2 सप्टेंबरला हा आदेश जारी केला होता. आज त्यांनी हा आदेश मागे घेत असल्याचे निवेदन प्रसिद्ध केले.