Captain Anshuman Singh Father: सियाचीनमधील भारतीय लष्करी तळाला लागलेल्या आगीदरम्यार वीरमरण आलेले आणि मरणोत्तक किर्ती चक्र प्रप्त शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या वडिलांनी आता त्यांच्या सुनेवर गंभीर आरोप केले आहेत. 'अंशुमनची पत्नी स्मृती सिंह ही किर्ती चक्र पुरस्कार आणि त्याबरोबर मिळालेला निधी घेऊन परदेशात पळून जाण्याच्या तयारी होती,' असं अंशुमन यांच्या वडिलांनी म्हटलं आहे. 


मुर्मू यांच्या हस्ते अंशुमन यांच्या आई आणि पत्नीने स्वीकारलं किर्ती चक्र


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅप्टन अंशुमन यांच्या वडिलांनी स्मृतीने अंशुमनला प्रेमाच्या नावाखाली फसवल्याचा आरोप 'एबीपी न्यूज'शी बोलताना केला आहे. "त्याचं तिच्यावर प्रेम नव्हतं," असा दावा अंशुमनच्या वडिलांनी केला आहे. 7 जुलै रोजी स्मृती आणि तिच्या सासूने देशातील लष्करी जवानांना दिला जाणारा दुसरा सर्वोच्च पुरस्कार असलेला किर्ती चक्र पुरस्कार राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वीकारला. या सोहळ्यानंतर स्मृतीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल भाष्य करताना तिची आणि अंशुमनची भेट कशी झाली होती याबद्दल सांगितलं. इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये आम्ही दोघे पहिल्यांदा एकमेकांना भेटलो आणि पाहता क्षणी एकमेकांच्या प्रेमात पडतो, असं स्मृतीने सांगितलं आहे. 


अंशुमनच्या वडिलांचा धक्कादायक दावा


मात्र आता, अंशुमनच्या वडिलांनी स्मृतीचं आपल्या मुलावर प्रेम नव्हतं, असा दावा केला आहे. स्मृती अंशुमनला मिळालेला वीर चक्र पुरस्कार आणि त्याबरोबरचा निधी घेऊन ऑस्ट्रेलिया पळून जाण्याच्या तयारी होती असा आरोपही अंशुमनच्या वडिलांनी केला आहे. अंशुमनच्या आई-वडिलांनी पुरस्कार मिळाल्याच्या दोन दिवसांनंतरच स्मृतीवर ती पुरस्कार आणि अंशुमनचे कपडे, फोटो अल्बम घेऊन घरातून निघून माहेरी गेल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता काही दिवसांनी स्मृतीचा ऑस्ट्रेलियाला पळून जाण्याचा प्लॅन असल्याचा धक्कादायक दावा अंशुमनच्या वडिलांनी केला आहे. स्मृती अंशुमनच्या सर्व गोष्टी घेऊन पंजाबमधील गुरुदासपूर येथील स्वत:च्या माहेरी निघून गेल्याचं अंशुमनच्या पालकांचं म्हणणं आहे.


स्मृतीने पत्ताही बदलून घेतला


प्रसारमाध्यमांमधील बातम्यांनुसार, स्मृतीने शहीद पती अंशुमन यांचा सरकारकडे असलेला कायमस्वरुपी पत्ताही बदलला आहे. लखनऊ येथील अंशुमन यांच्या आई वडिलांच्या घरचा पत्ता बदलून स्मृतीने त्या जागी तिच्या माहेरच्या घरचा म्हणजेच गुरुदासपूरचा पत्ती दिला आहे. म्हणजेच यापुढे सरकार अंशुमन यांच्यासंदर्भात जो काही पत्रव्यवहार करेल तो थेट स्मृतीशी केला जाईल. 


तो नियम बदलण्याची मागणी


अंशुमन यांनी लष्करामधील 'नेक्स ऑफ किन'संदर्भातील नियम बदलण्याची मागणी केली आहे. सेवेत असलेल्या व्यक्तीला काही झाल्यास त्यांच्या मालकीच्या वस्तूंची मालकी कोणाकडे असेल याची किंवा या व्यक्तींच्या आरोग्यासंदर्भातील माहिती ज्यांना दिली जाते त्यांना वारस समजलं जातं. विम्यामध्ये किंवा इतर ठिकाणी नॉमिनी असतो तसाच हा प्रकार आहे. यामध्येही बदल करण्याची अंशुमन यांच्या वडिलांची मागणी आहे. एखादी व्यक्ती जेव्हा लष्करात भरती होते तेव्हा त्यांच्या पलकांचे किंवा संगोपन करणाऱ्यांचं नाव 'नेक्स ऑफ किन' म्हणून नोंदवून घेतलं जातं. मात्र लग्न झाल्यानंतर पालकांऐवजी तिथे पत्नीचं नाव लावलं जातं. हा नियम बदलला जावा असं अंशुमन यांच्या वडिलांचं म्हणणं आहे.