Captain Anshuman Singh Wife Smriti singh : भारतीय लष्करातील शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांना मरणोत्तर किर्तीचक्र हा बहुमान सरकारकडून देण्यात आला. हा मान स्विकारण्यासाठी राष्ट्रपती भवनात अंशुमन यांच्या पत्नी आणि आई उपस्थितीत होत्या. यावेळी अंशुमन यांची पत्नी स्मृती यांनी त्यांच्या प्रेम कहाणीबद्दल सांगितली. त्यानंतर सोशल मीडियावर सर्वत्र तिच्याबद्दल हळहळ व्यक्त होत असताना एक धक्कादायक घटना समोर आली. अंशुमन यांचं वडील रवी प्रताप सिंह आणि आई मंजू देवी यांनी विधवा सून स्मृती सिंह यांच्यावर गंभीर आरोप केलंय. सासरच्या मंडळींनी केलेल्या आरोपांवर अखेर स्मृतीने मौन सोडलंय. (captain anshumans wife broke her silence on the allegations made by her in laws)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुलै 2023 मध्ये सियाचीन आगीच्या घटनेत शहीद झालेले कॅप्टन अंशुमन सिंग यांच्या पालकांनी दावा केलाय. की, त्यांची सून स्मृती, त्यांच्या मुलाला सरकारने मरणोत्तर दिलेले कीर्ती चक्र, त्यांचे फोटो अल्बमसह, कपडे आणि इतर स्मृतीचिन्ह घेऊन माहेरी निघून गेली.'


शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या आई-वडिलांनी काय आरोप केले?


मीडियाशी बोलताना कॅप्टन अंशुमन सिंगचे वडील रवि प्रताप सिंग म्हणाले की, त्यांच्या सुनेने त्यांच्या मुलाशी संबंधित लखनऊ ते गुरुदासपूरपर्यंतच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये नोंदवलेला कायमचा पत्ता बदलला आहे. फक्त त्यांना काहीही मिळाले नसल्याचा आरोप शहीदांच्या पालकांनी केलाय. सून भरपूर पैसे घेऊन माहेरी निघून गेलीय. वृत्तानुसार, योगी सरकारने शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रोख आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी आणि त्यांच्या घराजवळील रस्त्याचं नाव देण्याचं आश्वासन दिलंय.


हेसुद्धा वाचा - 'अंशुमनचं किर्तीचक्र घेऊन सून माहेरी गेली आणि...', शहीद जवानाच्या आई- वडिलांचा गंभीर आरोप



 'ज्यांचे जसे विचार...'


दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या पत्नी स्मृती सिंह म्हणाल्या की, 'मला सध्या याबाबत कोणतीही माहिती नाही. ज्यांचे जसे विचार तो तसच बोलणार. माझी हरकत नाही. मी आत्ता बाहेर आहे. मी अद्याप त्यांचा  व्हिडीओ पाहिला नाही. मी आधी व्हिडीओ बघेन मग फोन करेन.'


शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या स्मृती सिंह या व्यवसायाने इंजिनियर आहेत आणि तिचे पालक हे शाळेचे मुख्याध्यापक आहेत. रिपोर्टनुसार, स्मृती सिंहच्या पालकांनी या संपूर्ण प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे. 


हेसुद्धा वाचा - पहिल्या नजरेत प्रेम, 8 वर्ष लाँग डिस्टन्स रिलेशनशिप; फेब्रुवारीत लग्न अन् जूनमध्ये...शहीद कॅप्टनच्या पत्नीचा Video पाहून गहिवरून जाल


ते म्हणाले की, 'स्मृती सध्या कुठेतरी बाहेर गेली असून संध्याकाळी उशिरापर्यंत ती घरी परतेल. या संपूर्ण प्रकरणावर आपण काहीही बोलणे चुकीचं ठरेल. याप्रकरणी स्मृतीच तिची बाजू मांडेल. स्मृती यांच्या सासरच्या मंडळींनी केलेल्या आरोपांवर आमच्या कुटुंबातील इतर कोणाचेही काही म्हणणे नाही. शिवाय स्मृतीच्या सासरच्या मंडळींचा आरोपाबद्दल मीडियामधून समजलं. यासंदर्भात ते आधी आमच्याशी काहीही बोलेले नाहीत.'