खुशखबर! ऑनलाईन फसवणुकीवर चाप, बँकेनं आणली नवी सेवा, पाहा तुमचा कसा होणार फायदा
त्यातून या घोटाळ्यांपासून वाचण्यासाठी आपण काय करायला हवे आणि काय नको याची चाचपणीही आपण करत असतो.
Card Tokenization: आजकाल ऑनलाईन बँकांचे घोटाळे हा चर्चेचा आणि तितकाच गंभीर विषय आहे. त्यातून या घोटाळ्यांपासून वाचण्यासाठी आपण काय करायला हवे आणि काय नको याची चाचपणीही आपण करत असतो.
कार्ड टोकनायझेशन हा शब्द तुम्ही गेल्या काही दिवसांपासून ऐकत असाल. खरंतर हाच तो शब्द आहे जो या घोटाळ्यांपासून आपल्याला वाचवू शकतो. जर तूम्ही हा शब्द ऐकला नसेल तर आम्ही तूम्हाला सांगतोय की नक्की या कार्ड टोकनायझेशनचा फायदा का आहे? आणि कसा होतो?
टोकनायझेशन अंतर्गत कार्डद्वारे व्यवहार करण्यासाठी 'युनिक ऑलटरनेट टोकन' जनरेट होतो. या टोकनाचा फायदा असा की, या टोकनद्वारे जेव्हा तुम्ही व्यवहार कराल तेव्हा तुमची खाजगी माहिती लिक होणार नाही कारण ऑनलाइन बँकिंग फसवणूक रोखणे हा या टोकनायझेशन प्रणालीचा उद्देश आहे.
हे टोकन केवळ त्या विशिष्ट व्यक्तीसाठी असेल तसेच तिसरा कोणीही व्यक्ती याचा वापर करू शकणार नाही. टॉकनाझेशन हे मोबाईल फोन आणि टॅब्लेटपुरते मर्यादित आहे. ही प्रक्रिया स्मार्टवॉच किंवा अन्य उपकरणाद्वारे करता येत नाही. RBI म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकने कार्ड टोकनायझेशन प्रणाली लागू करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे, यापूर्वी ही मुदत 1 जुलै होती. 30 सप्टेंबरपासून कार्ड टोकनायझेशनसाठी प्रत्येक वेळी ऑनलाइन पेमेंट करताना card varification value म्हणजेच CVV देण्याची गरज लागेल.
कसं कराल कार्ड टोकनाईझ...
- शॉपिंग साईवर जाऊन काहीतर खरेदीसाठीसाठी कार्टवर जा.
- यानंतर कार्ड पेमेंट पर्याय निवडा आणि CVV टाका.
- Save card as per RBI guidelines किंवा Secure your card वर क्लिक करा.
- आता Save वर टॅप करा आणि OTP टाका.
- यानंतर तुमचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड टोकन केले जाईल.