मुंबई: कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. व्यवसाय बंद करण्याची वेळ आली. तर दुसरीकडे आहे ती नोकरी टिकवण्याचं नवं आव्हान आता नोकरीच्या ठिकाणी काम करणाऱ्यांसमोर आहे. आपण जिथे काम करतो तिथे जर आपली प्रगती करायची असेल तर काही गोष्टी पाळणं खूप महत्त्वाचं असतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कामाच्या ठिकाणी काही चुका टाळल्या तर आपल्याला अधिक फायदा होतो. हा फायदा कामासाठीच नाही तर  Increment मध्ये होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत. कामाच्या ठिकाणी कोणत्या चुका होऊ नयेत किंवा कशी काळजी घ्यायची. 


कामाशी काम ठेवा


ऑफिसमध्ये आपली इमेज खराब होणार नाही याची काळजी घ्या. आपली इमेज ऑफिसमध्ये नकारात्मक होणार नाही याची काळजी घ्या. कोणत्याही वादात किंवा राजकारणात अडकणार नाही याची काळजी घ्या.


ऑफिसमध्ये आपलं वर्तन नीट ठेवा


ऑफिसमध्ये हसतं-खेळतं वातावरण राहायला हवं. पण त्याचा अर्थ तुम्ही कोणाशी गैरप्रकार किंवा फ्लर्ट करत असाल तर ते चुकीचं ठरतं. आपलं वर्तन चुकीचं होईल असं वागू नका. हसत खेळत वावरतानाही आपल्या बोलण्या-वागण्यातून कोणतंही चुकीचं वाक्य किंवा वर्तन होणार नाही याची काळजी घ्या.


ऑफिसमध्ये वेळा पाळा


ऑफिसमध्ये आपलं काम करण्याची वेळ पाळा. ऑफिसमध्ये लेट मार्क लागणार नाही याची काळजी घ्या. कामाच्या वेळेत लंच ब्रेक किंवा मधला ब्रेक घेताना जास्त वेळ टाइमपास होणार नाही याची काळजी घ्या. 


फोनचा वापर कमी करा


ऑफिसमध्ये सतत फोनवर राहाणंही धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे फोनवर बोलणं टाळा. कामाशिवाय फोनवर सतत राहू नका. त्यामुळे चुकीचा मेसेज तुमच्या मॅनेजरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 


ऑफिसमधील राजकारण किंवा गॉसिपमध्ये आपला वेळ वाया घालवू नका. त्यामुळे तुमची इमेज तर खराब होतेच शिवाय विनाकारण या प्रकरणात आपलं नाव खराब होतं. वेळ वाया जातो तो वेगळाच. इतर सहकाऱ्यांचं तुमच्याबद्दल मत बदलू शकतं यामुळे त्यामुळे काळजी घ्या.