मुंबई: कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक कंपन्या अजूनही वर्क फ्रॉम होम करत आहेत. तर काही कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष मुलाखती ऐवजी टेलिफोनिक मुलाखत घेण्यात येते. या मुलाखतीमध्ये काही छोट्या छोट्या चुका उमेदवार करतात ज्यामुळे त्यांना आलेली चांगली ऑफर मिळत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही जर अशा कुठल्या मुलाखतीला सामोरे जाणार असाल, किंवा भविष्यात जर तुम्ही अशा प्रकारची मुलाखत देणार असाल तर तुम्ही या गोष्टी पाळायला हव्या. या चुका टाळायला हव्यात. तर तुमची मुलाखत आणखी चांगली होऊ शकते. तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. 


तुमच्या मुलाखतीच्या शैलीने मालकाला प्रभावित करावे लागेल. टेलिफोनिक मुलाखतीत यशस्वी होण्यासाठी या टिप्स खूप उपयुक्त ठरू शकतात. 


फोनवर बोलताना सकारात्मक राहा


तुम्ही फोनवर बोलत असताना प्रश्न नीट ऐकून शांतपणे आपला मुद्द मांडा. बोलताना कुठेही नकारात्मकता नसावी. तुम्ही जे बोलता ते अभ्यासपूर्ण असेल याची काळजी घ्या. व्हिडीओ कॉलिंग असल्यास अपटू डेट ड्रेसपासून ते तुमच्या उत्तरापर्यंत सर्व गोष्टी पडताळल्या जातात. 


मुलाखत देताना नेहमी सकारात्मक उत्तरं द्या. प्रत्येक उत्तरात आत्मविश्वास आणि काम करण्याची तयारी असल्याचं दिसून यायला हवं. तरच तुमचा पुढे नोकरीसाठी विचार केला जाऊ शकतो. 


नेटवर्क चांगलं ठेवा


तुम्ही जिथून मुलाखत देणार आहात तिथे नेटवर्क चांगलं राहील याची काळजी घ्या. सतत कॉल कट होणं हे चांगलं लक्षण नाही. त्यामुळे आपली छाप समोरच्यावर चांगली पडत नाही. मुलाखत एकसंध झाली तर निवड करणाऱ्यालाही ते अधिक सोयीचं आणि सोपं होतं. 


काही प्रश्नांची उत्तरं आधीच तयार करा


मुलाखतीमध्ये तुमची ग्रोथ, कंपनीची ग्रोथ, तुम्ही पाच वर्षात स्वत:ला कुठे पाहाता, अशा काही प्रश्नांची उत्तर ही आधीच तयार करून ठेवा. याशिवाय चांगला उभ्यास असेल तर मुद्द्याला धरून तुम्हाला अधिक सविस्तर बोलता येतं. याशिवाय आपल्या फिल्डच्या आसपासची अधिक माहिती (GK) हे देखील माहिती असणं आवश्यक आहे. 


टेलिफोनिक मुलाखतीमध्ये कायम आपला मुद्द शांतपणे आणि संयमाने मांडा. आपला आवाज योग्य तिथे वर-खाली झाला तर ठिक पण कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देताना आवाज चढणार नाही किंवा खूपच नकारात्मक येणार नाही याची काळजी विशेष घ्यायला हवी.