नवी दिल्ली : सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) ने २२ फेब्रुवारीला जागतिक बाल लैंगिक शोषण करणाऱ्या रॅकेटचा भांडफोड केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीबीआयने उत्तर प्रदेशच्या कन्नोजमधून २० वर्षाच्या निखिल वर्मा आणि त्याच्या ४ मित्रांना अटक केलीए.


व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून ते जगभरातील वेगवेगळ्या देशातील मुलांन पॉर्न सिनेमा आणि फोटो दाखवत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हा ग्रुप २ वर्षांपासून सुरू होता. 


व्हॉट्सअॅप ग्रुप 


 'kids xxx' नावाचा हा व्हॉट्सअॅप ग्रुप होता. यामध्ये लहानग्यांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ शेयर केले जायचे.


अमेरिका, चीन, न्यूझीलंड, मॅक्सिको, अफगाणिस्तान, पाकिस्तान, ब्राझील, केनिया, नायझेरिया आणि श्रीलंकासारख्या देशांतील ११९ जण सहभागी होते. १८ देशांतील १९९ जण सहभागी असल्याचेही एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.


मुंबई, दिल्लीतील आरोपी 


 सीबीआयने टाकलेल्या धाडीत स्मार्टफोन, लॅपटॉप, हार्ड डिस्क आणि अनेक डिवाईस सापडल्या.


निखिलच्या ४ मित्रांपैकी नफीस रेजा आणि जाहिद दिल्लीत, सत्येंद्र ओम प्रकाश चौहान मुंबईत आणि आदर्श हा नोएडात राहतो. मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयने दिल्ली, मुंबई, नोएडा आणि कन्नोजमधील पाचही ठिकाणांवर छापे मारले. 


गुन्हा दाखल 


सीबीआयने याप्रकरणी आयटी अॅक्ट सेक्शन ६७ बी आणि पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलाय.


चाइल्ड बॉर्न पाहणे, उद्युक्त करणे किंवा रेकॉर्ड करणाऱ्यांस ७ वर्षाची कैद आणि १० लाख दंड होऊ शकतो. सीबीआयने सर्व आरोपींना अटक करण्यासाठी वेगाने पाऊले उचलली आहेत.